उपचार घेत असताना प्रभुदेवा डॉक्टरच्या पडला प्रेमात, लॉकडाऊनमध्ये उरकले लग्न

Prabhu Deva Is Married To A Mumbai-Based Doctor, Confirms His Brother
उपचार घेत असताना प्रभुदेवा डॉक्टरच्या पडला प्रेमात, लॉकडाऊनमध्ये उरकले लग्न

बॉलिवूड आणि टॉलीवूडमध्ये आपल्या डान्स, अभिनय आणि कोरिओग्राफीने लोकांची मने जिंकणार प्रभुदेवाने दुसरे लग्न केले आहे. सध्या प्रभुदेवाच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रभुदेवाने आपल्या भाचीसोबत लग्न केल्याची समोर आले होते. पण हे सत्य नव्हते. मात्र आता प्रभुदेवाने एका डॉक्टर महिलेसोबत लग्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रभुदेवाच्या भावाने खुलासा केला आहे.

प्रभुदेवा भाऊ राजू सुंदरमने सांगितले की, ‘मुंबईतील साकीनाका येथे राहणाऱ्या फिजिओथेरेपिस्ट डॉक्टर हिमानी सोबत लग्न झाले आहे. जेव्हा प्रभुदेवा पाठ आणि पायासाठी उपचार घेत होता तेव्हा त्या दोघांची भेट झाली. प्रभुदेवाला पाय आणि पाठीला अंतर्गत जखम झाली होती. या दोघांचे लग्न लॉकडाऊन दरम्यान मे महिन्यात झाले होते.’

प्रभुदेवा आणि हिमानी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी पहिल्यांदा चेन्नईला गेले होते. त्यानंतर प्रभुदेवा आणि डॉ. हिमानी २ महिने लिव-इन रिलेनशिपमध्ये होते. मग दोघांनी प्रभुदेवाच्या चेन्नईतल्या घरी लग्न केले. या लग्न सोहळ्यात कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हते, कारण त्यावेळेस देशात लॉकडाऊन होता.

माहितीनुसार, अलीकडेच प्रभुदेवाने हिमानीच्या कुटुंबाची भेट घेतली. प्रभुदेवाने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. यापूर्वी त्याने रामलतासोबत लग्न केले होते. त्यानंतर प्रभुदेवा साऊथची सुपरस्टार नयनतारासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते. ज्यामुळे प्रभुदेवाचे पहिल्या पत्नीसोबत अंतर निर्माण झाले. पण नंतर नयनतारा आणि प्रभुदेवाचे जास्त काळ रिलेशनशिप टिकले नाही आणि त्याने हिमानी सोबत लग्न केले.


हेही वाचा – Birthday Special: ‘या’ डायलॉगमुळे बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयचं नशीब बदललं