घरमनोरंजनप्राचीचा बॉलिवूडमध्ये कमबॅक, या भूमिकेत दिसणार

प्राचीचा बॉलिवूडमध्ये कमबॅक, या भूमिकेत दिसणार

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाई सिल्वर स्क्रिनवर कमबॅक करणार आहे. लवकरच ती तिच्या एका आगामी चित्रपटात दिसणार असून एका वेगळ्याच भूमिकेत ती पाहायला मिळणार आहे.

टेलिव्हिजनच्या ‘कसम से’ या मालिकेमधील आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री प्राची देसाई ने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘रॉक ऑन’, वन्स अपॉन ए टाईम इन मुम्बई’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारखे सुपरहिट सिनेमे प्राचीने केले आहेत. परंतु प्राची बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळवू शकली नाही. गेल्या काही वर्षापासून ती बॉलिवूडपासून लांबच आहे. कोणत्याही चित्रपटात ती दिसली नाही आहे. यामुळे प्राचीचे चाहतेही तिच्या कमबॅकची वाट बघत होते. तिचे चाहते दरवेळी तिच्या कमबॅक विषयीच प्रश्न तिला विचारताना दिसायचे. अखेर प्राचीने तिच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. लवकरच प्राची एक नवीन चित्रपट घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राची आता ‘सायलेन्स कॅन यू हियर इट’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे प्राचीच्या या आगामी चित्रपटात ती पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Desai (@prachidesai)

 प्राची तिच्या या आगामी चित्रपटात निरीक्षक संजनाची भूमिका साकारत असून अत्यंत धाडसी अशी ही भूमिका असणार आहे. तिच्या या भूमिकेबद्दल बोलताना प्राचीने सांगितले की, इन्स्पेक्टर संजनाला कोणत्याही गोष्टीत हार मानायची नसते. बेधडकपणे ती आलेल्या गोष्टींचा सामना करते. यापूर्वी मला चाहत्यांनी कधीही अशा प्रकारची भूमिका साकारताना पाहिले नव्हते त्यामुळे ही भूमिका पाहिसल्यानंतर रसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. असे ती प्रेक्षकांना म्हणाली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात मनोज बाजपेयी आणि अर्जुन माथुर यांच्याही भूमिका आहे.

- Advertisement -

हे वाचा- सनी लिओनच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर, मुंबईतून तरुणाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -