घरमनोरंजनप्रदीप विरूद्ध प्रदीप

प्रदीप विरूद्ध प्रदीप

Subscribe

व्यावसायिक कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी ज्या स्पर्धा महत्त्वाच्या मानल्या जातात त्यात सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी ही स्पर्धा महत्त्वाची वाटायला लागते. एकतर रोख रक्कम दुसरं म्हणजे प्रेक्षकांची पसंती आणि तिसरं म्हणजे भव्यदिव्य अशा वातावरणात ही स्पर्धा होत असते. ज्याच्या आयोजनात अध्यक्ष अर्चना नेवरेकर आणि संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांचा सहभाग असतो.

नाटक, चित्रपट, मालिका यांच्यासाठी या संस्थेच्यावतीने स्पर्धा घेतली जाते. प्रदीप मुळ्ये नेपथ्यकार म्हणून जेवढे परिचयाचे आहेत तेवढेच प्रकाशयोजना, वेशभूषा, दिग्दर्शन यातसुद्धा त्यांनी आपली हुकूमत दाखवलेली आहे. सांस्कृतिक कला दर्पणच्या नामावलीत एक चमत्कार झालेला आहे तो म्हणजे प्रदीप विरूद्ध प्रदीप अशी काहीशी स्पर्धा त्यांच्याबाबतीत घडणार आहे. नाट्य विभागात नेपथ्यासाठी संभाव्य यादीसाठी जी तीन नावे निवडलेली आहेत त्या तिन्हीही नाटकांसाठी नेपथ्य म्हणून प्रदीप मुळ्ये यांनी काम पाहिलेले आहे. सोयरे सकळ, हॅम्लेट, गुमनाम हौ कोई ही ती तीन नाटके आहेत. अंतिमसाठी कोणतेही नाटक निवडले तरी नेपथ्याचे पारितोषिक हे प्रदीपलाच असणार आहे. सामूहिकपणे कुठल्या नाटकाने किती पारितोषिके मिळवली याहीपेक्षा प्रदीपचे नाव आणखीन कोणत्या गोष्टीसाठी निवडले गेले असेल याचीच चर्चा इथे अधिक होत होती.

- Advertisement -

गुमनाम है कोई या नाटकासाठी प्रकाशयोजना, हॅम्लेटसाठी वेशभूषा अशी जबाबदारी त्याने सांभाळलेली आहे. याही विभागात संभाव्य यादीत त्याच्या नावाचा समावेश आहे. अंतिमसाठी जी नाटके निवडलेली आहेत त्यात दादा एक गुड न्यूज आहे, सोयरे सकळ, गुमनाम है कोई ही नाटके आहेत. चित्रपट विभागात फर्ंजद, मुळशी पॅटर्न, न्यूड, सविता दामोदर परांजपे, डॉ. काशिनाथ घाणेकर हे चित्रपट आहेत. 11 मे या दिवशी सर्वोत्तम ठरलेल्या कलाकृतीची, व्यक्तीची घोषणा यावेळी केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -