लोकप्रिय ‘CID’ मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात दिर्घकाळ चालणाऱ्या ‘CID’ या मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते अखेर सिंगापूर येथील एका रुग्णालयामध्ये त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. याबाबत ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन माहिती दिली होती.

शिवाजी साटम यांनी केला शोक व्यक्त

शिवाजी साटम म्हणजेच ‘CID’ मालिकेतील उर्फ ​​एसीपी प्रद्युम्न यांनी सोमवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर निर्माता प्रदीप उपूर यांच्या निधनाची माहिती दिली होती. त्यांनी प्रदीप उपूर यांचा फोटो ट्विट केला त्यावर, “प्रदीप उपूर (सीआयडी शोचे आधारस्तंभ आणि निर्माता), माझा मित्र जो नेहमी हसतमुख, प्रामाणिक आणि बिनधास्त, मनाने खूप शुद्ध, बॉस तुमच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील एक उत्तम काळ संपला आहे. तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुमची खूप आठवण येत आहे.” निर्माता प्रदीप यांच्या निधनाची बातमी देत शिवाजी साटम यांनी शोक व्यक्त केला आहे.

1998 मध्ये झाली होती ‘CID’ची सुरुवात

निर्माता प्रदीप उप्पर मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘CID’मालिके व्यतिरिक्त, प्रदीप उप्पर यांनी ‘नेल पॉलिश’ आणि ‘अर्धसत्य’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मात्र, त्यांची ‘CID’ही मालिके प्रचंड गाजली. या मालिकेचा पहिला एपिसोड 21 जानेवारी 1998 रोजी प्रसारित झाला होता. 2018 मध्ये जेव्हा हा शो बंद झाल्याची बातमी आली तेव्हा चाहते खूप दुःखी झाले. 20 वर्षे टेलिव्हिजनवर राज्य करणाऱ्या या मालिकेने अनेक चाहत्यांचे मनोरंजन केले.

 


हेही वाचा :

विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’चे शूटिंग झाले पूर्ण