गुरू रंधावाच्या गाण्यासाठी प्रज्ञा जैस्वालने Salmanकडून मागितली होती ‘या’ गोष्टीची परवानगी, वाचून बसेल धक्का

गाण्याच्या शुटींग आधी एक दिवस मी सेटवर जाऊन सलमान खानला भेटले. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटता आणि ते ही भारतातील सर्वात मोठ्या स्टार सलमान खानला भेटता तेव्हा आपल्याकडून काहीही चुकीचे होणार नाही ना? असे वाटत होते.

Pragya Jaiswal had asked Salman permission to can i touch you for Guru Randhawa song
गुरू रंधावाच्या गाण्यासाठी प्रज्ञा जैस्वालने Salmanकडून मागितली होती 'या' गोष्टीची परवानगी, वाचून बसेल धक्का

अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल (pragya jaiswal)  गुरू रंधावाच्या (guru randhawa)  ‘मैं चला’ (Main Chala) या गाण्यात सलमान खानसोबत (Salman Khan )  झळकली होती. सलमान आणि प्रज्ञाची कमाल केमिस्ट्रीने प्रेक्षकांना इंप्रेस केले होते. मात्र या गाण्याच्या शुटींगवेळी प्रज्ञाने सलमान काही प्रश्न विचारले होते. ज्याची आज प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. प्रज्ञाने एका मुलाखतीत या गाण्याचे अनुभव आणि सलमान सोबत झालेल्या केमिस्ट्रीविषयी सांगितले होते.

प्रज्ञा जैस्वाल ही साउथची लोकप्रिय अभिनेत्री आहे. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले होते, ‘गाण्याच्या शुटींग आधी एक दिवस मी सेटवर जाऊन सलमान खानला भेटले. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटता आणि ते ही भारतातील सर्वात मोठ्या स्टार सलमान खानला भेटता तेव्हा आपल्याकडून काहीही चुकीचे होणार नाही ना? तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे ना? हे आधी लक्षात घेतले पाहिजे. आपल्याकडून चुकूनही समोरच्या व्यक्तीला त्रास होता कामा नये’.

प्रज्ञा पुढे म्हणाली, ‘मला पहिल्याच दिवशी जास्त आत्मविश्वास मिळाला होता आणि मी हिंमत करुन सलमान खानला विचारले की, मी तुम्हाला स्पर्श करू शकते का? आपण रोमँटीक गाणे शुट करणार आहोत. त्यात काही रोमँटीक सीन्स असणार, त्यासाठी आपल्यात चांगली केमिस्ट्री असायला हवी.त्यासाठीच मी परवानगी मागत आहे’. त्यावर सलमानने फार सहजपणे ‘काही हरकत नाही तू मला स्पर्श करू शकतेस’, असे म्हटले. सलमानसोबत पहिला दिवस फार अवघड गेला मात्र नंतर मी फार आमच्यात चांगली मैत्री झाली.

प्रज्ञा महेश मांजरेकरांच्या ‘अंतिम द फायनल ट्रूथ’ या सिनेमात होती. मात्र एडिटमध्ये तिचा सीन काढून टाकण्यात आला. मात्र गुरू रंधावाच्या मैं चला या गाण्यात प्रज्ञाला सलमानसोबत झळकण्याची संधी मिळाली.


हेही वाचा – हनीमून अर्धवट सोडत Ajay Devgan ने केला होता घरी जाण्याचा हट्ट, म्हणाला…