Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन प्राजक्ता म्हणतेयं प्रसुती वेदना सुरु झाल्यात; नवीन काहीतरी जन्माला घालतेय

प्राजक्ता म्हणतेयं प्रसुती वेदना सुरु झाल्यात; नवीन काहीतरी जन्माला घालतेय

Related Story

- Advertisement -

सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. आपले वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. अनेकदा तिच्या हटके लुकमुळे  ती चर्चेचा विषय ठरते. मात्र प्राजक्ताने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. या पोस्टमधून प्राजक्ता म्हणतेयं की, प्रसुती वेदना सुरु झाल्यात; नवीन काहीतरी जन्माला घालते. त्यामुळे नक्की प्राजक्ताला या पोस्टमधून काय सांगायचे यावरून अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.

प्राजक्ता माळी सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करत आहे. नुकतीच प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केलीय. यात तिने एक फोटे शेअर केलाय. ज्यावर ”उद्या काहीतरी जन्माला घालतेय. प्रसुती वेदना सुरु झाल्यात. बाळाला बघायला नक्की या.. ” असं लिहिले आहे. प्राजक्ताच्या फोटोवरील कॅप्शनमुळे प्राजक्ताची ही खास भेट नेमकी काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर या फोटोखाली माझ्या आयुष्यातलं अतिशय special live session, चुकवू नका. अशा आशयाची कॅप्शन लिहिली आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आज सकाळी १०.३० वाजता प्राजक्ता प्लॅनेट मराठीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरून लाईव्ह येणार आहे. त्यामुळे प्लॅनेट मराठी सोबतचा प्राजक्ता नवा काही तरी हटके प्रोजेक्ट प्लॅन करते असा अंदाज बांधला जातोय. प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तर चाहतेही तिला बऱ्याच दिवसांनंतर लाईव्ह पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या पोस्टवरून प्राजक्ता नक्कीच काही तरी हटके प्लॅन करतेयं अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.


- Advertisement -

 

- Advertisement -