‘आजच्या ठळक बातम्या- माळी टाइम्स’; बातम्यांची प्रिंट असलेल्या साडीमुळे प्राजक्ता माळी ट्रोल

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. त्यातलेच काही फोटो तिने सोशल मीडियावर सुद्धा शेअर केले. या फोटोला प्राजक्ताने जे कॅप्शन दिले त्या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने(prajakta mali) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच प्राजक्ताने निवेदिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर ‘प्राजक्त प्रभा'(prajakt prabha) का कविता संग्रह प्रकाशित करून एक कवयित्री म्हणूनही प्राजक्ता वाचकांसमोर आली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. त्यातलेच काही फोटो तिने सोशल मीडियावर सुद्धा शेअर केले. या फोटोला प्राजक्ताने जे कॅप्शन दिले त्या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

हे ही वाचा –  ‘हृताचं विशेष कौतुक’; अनन्या चित्रपटासंदर्भात प्राजक्ताने केली खास पोस्ट

प्राजक्ता माळी ही नेहमीच वेगवेगळ्या लूक मध्ये दिसते. नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं आहे. त्यात तीने एक साडी परिधान केली आहे. या साडीवर विविध इंग्रजी बातम्या प्रिंट(english news print saadi) केलेल्या आहेत. या आधीही प्राजक्ताने याच साडीमधील काही फोटो शेअर केले होते. प्राजक्ताने याला एक मस्त कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यात ती म्हणाली, ”पॅरिस मधील संध्याकाळ, ( ही साडी समर कलेक्शनची आहे, फोटो पोस्ट करता करता पावसाळा उजाडला… असो, दुसऱ्या उन्हाळ्यासाठी बघून ठेवा)”, असं कॅप्शन प्राजक्ताने दिले होते. त्यावरून तिला ट्रोल सुद्धा करण्यात आलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

हे ही वाचा –  प्रेग्नेंट आलियाचे ‘डार्लिंग’च्या प्रमोशन दरम्यानचे फोटो होतायत व्हायरल

त्यानंतर प्राजक्ताने(praakta mali) आता पुन्हा एकदा याच साडीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. आणि त्याला तिने एक खास कॅप्शन सुद्धा दिले. ”आजच्या ठळक बातम्या – माळी टाइम्स .(आजचं कॅप्शन परवाच्या कमेंट्स मधून ढापलेलं आहे. म्हणून बातम्या इंग्रजीतून असल्या तरी नाव – मथळा मराठीत आहे.) असं प्राजक्ताने या कॅप्शन मधून म्हटले आहे. तिच्या या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. प्राजक्ताची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्स सुद्धा केल्या आहेत. ‘आजची ठळक बातमी खूपच आवडली’, अशी कमेंट केला चाहत्याने केली आहे. तर एकाने म्हटलं आहे ‘पेपर सोबतची ”पुरवणी” कुठंय… हॅशटॅग प्राजु’ असंही एकाने कमेंट करत म्हंटल आहे. त्याचसोबत ‘ब्रेकिंग न्यूज: रद्दीचा भाव गगनाला भिडला’ अशी कमेंट एक चाहत्याने केली आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर अश्या भन्नाट कमेंट्स आली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

हे ही वाचा –  लेडीज स्पेशल बस, सुबोध भावेचा नवा कार्यक्रम लवकरच

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच काही न काही कारणामुळे चर्चेत असते. मध्यंतरी प्राजक्ताची रानबाजार(ranbazar) ही वेब सिरीज प्रदर्शित झाली होती. या वेब सिरीज मध्ये प्राजक्ता एका वेगळ्याच भूमिकेत दिसली होती. प्राजक्ताच्या या भूमिकेला आणि वेब सिरीजला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आणि आता प्राजक्ताने परिधान केलेल्या साडीमुळे ती चर्चेत आली आहे.

हे ही वाचा –  Prajaktta Mali Post : ‘लहान तोंडी मोठा घास, पण.. ; प्राजक्ता माळीची…