घरमनोरंजनबिग बॉस १३ बंद होणार?

बिग बॉस १३ बंद होणार?

Subscribe

बिग बॉस १३ हे पर्व पहिल्या दिवसापासून वादात सुरू आहे. पण आता हा कार्यक्रम बंद व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. सगळ्या स्तरातून आता बिग बॉस १३ बंद करा अश्या मागण्या होत आहेत.

- Advertisement -

प्रेक्षकांकडून होणाऱ्या मागणीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी आपल्या सहकार्यांकडे लोकांच्या तकरारी बाबत रिपोर्ट मागवले आहेत.

- Advertisement -

बिग बॉस १३ बंद करा अशा आशयाचे पत्र माझ्याकडे आले आहे. याबाबत मी रिपोर्ट मागवले आहेत. यूपी मधील गाजियाबादमधील भाजपा विधायक नंद किशोर गुर्जर यांनी एक पत्र लिहीत हा कार्यक्रम बंद करावा अशी मागणी केली आहे. बिग बॉस १३ हा अश्लीलता पसरवणारा आणि सामाजिक नैतिकतेच्या विरोधात जाणारा हा कार्यक्रम आहे.

त्याचप्रमाणे हिंदू परिषद यांनी बिग बॉस १३ चा होस्ट हा लव जिहाद वाढवायला मदत करत आहे असा आरोप केला आहे. तर कोही लोकांनी बेड शेअरींवरही आक्षेप केला आहे. या कार्यक्रमाच्या निषेधार्त आंदोलनही करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -