बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार वेडात मराठे वीर दौडले सात या आगामी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षयने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचे सांगितले. तसेच एक व्हिडीओ शेअर करत त्याने छत्रपती शिवरायांच्या लूकमधील एक व्हिडीओ देखील शेअर केला. मात्र, या व्हिडीओवरुन देखील अक्षयला आणि चित्रपटाच्या टीमला ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, आता या ट्रोलर्समध्ये साऊथ अभिनेता प्रकाश राजदेखील सहभागी झाला आहे.
प्रकाश राजने उडवली अक्षय कुमारची खिल्ली
अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका साकारलेला अक्षय सिंहासनावरुन खाली चालत येतो तेव्हा त्याच्यामागे एक बल्बचे झुंबर दिसत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी 1640 ते 1680 या काळात साम्राज्य केलं आणि थॉमस एडिसनने 1880 मध्ये बल्बचा शोध लावला होता. मग शिवाजी महाराजांच्या काळात हा बल्ब कुठून आला? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावरुन अनेकजण चित्रपटाला पुन्हा ट्रोल करु लागले.
Mann Ki baat .. #justasking pic.twitter.com/gH3tepX1AA
— Prakash Raj (@prakashraaj) December 7, 2022
दरम्यान, यावर अभिनेता प्रकाश राजने देखील प्रश्न उपस्थित करत अक्षयवर निशाना साधला आहे. ट्वीटरवर प्रकाश राजने एक स्क्रीनशॉर्ट शेअर केलंय सोबतच त्यांनी अक्षय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मीम्स देखील शेअर केले आहे.
अक्षय व्यतिरिक्त हे कलाकारही चित्रपटात असणार मुख्य भूमिकेत
‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त विराज मडके, तुळजा जामकर, जय दुधाणे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रवीण तरडे हे कलाकार देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारतील. डिसेंबरपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, वर्ष 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा :