घरमनोरंजनप्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी हॉटसीटवर!

प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी हॉटसीटवर!

Subscribe

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते.

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या उपस्थित राहणार असून त्यांच्या ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था, अकोले’ या संस्थेला मदत म्हणून महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील लाडका कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यातील हास्यवीर गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट हेही उपस्थित राहणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात राहीबाई पोपेरे यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्याबरोबर हास्यवीर असल्याने हा भाग निश्चितच रंगतदार होणार आहे.

- Advertisement -

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कार्यक्रमातल्या हास्यवीरांनी पडद्यामागचे अनेक किस्से ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात उलगडले. गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट या सगळ्यांचा प्रवास आणि विशेष गुण यांची माहिती या भागात सांगण्यात आली. एरवी खळखळून हसवणारा ओंकार किती शांत आणि सामाजिक कार्याची आवड जपणारा आहे, रसिकाची मालवणी भाषेची आवड, कुठल्या स्कीटनंतर प्रसाद किस्सा सांगतो अशी अनेक गुपितं या विशेष भागात उलगडली गेली आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोनी मराठीवर पुन्हा कधीपासून सुरू होणार, याबद्दलची माहितीही या विशेष भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.


हेही वाचा :रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -