मराठी कलाविश्वात प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे जोडपं कायम चर्चेत असतं. कधी आगामी सिनेमा तर कधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रीलसाठी ही जोडी लाइमलाईटमध्ये असते. अभिनय, निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवणाऱ्या प्रसाद ओकचा आज वाढदिवस. यानिमित्त सोशल मीडियावर त्याचे चाहते अनेक पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. इतक्या खास दिवशी त्याची बायको कशी काय मागे राहील? मंजिरीनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिच्या हटके अंदाजात पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Prasad Oak Birthday Special Post Shared By His Wife Manjiri)
मंजिरी ओकची पोस्ट
अभिनेता प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी मंजिरी ओकने एक खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिने प्रसादसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यापैकी एकही फोटोत ते एकमेकांकडे पाहताना दिसत नाहीत. हे फोटो शेअर करून मंजिरीने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘का आहेत हे असे फोटोज? आणि मी आज का पोस्ट केलेत हे? प्रसाद त्याचं कारण, तुझ्या हे नेहमी लक्षात राहावं की जरी आपण एकमेकांकडे बघत नसलो तरी माझं लक्ष तुझ्यावरच आहे. बाकी ”हॅप्पी बर्थडे” वगैरे आहेच. ते होतंच राहील’.
View this post on Instagram
मंजिरी ओकच्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी लिहिलंय, ‘कशी आहेस गं तू? म्हणूनच मला आवडतेस’. तर प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, सरिता मेहेंदळे जोशी, मंजिरी सुबोध भावे यांनी कमेंट करत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, प्रसाद ओकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर आगामी काळात त्याचा ‘गुलकंद’, ‘सुशीला सुजीत’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी ‘सुशीला सुजीत’मध्ये सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकरसारखा जबरदस्त ट्रायो पहायला मिळेल. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर ‘गुलकंद’मध्ये स्वतः प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौघुले, जुई भागवत, वनिता खरात, ईशा डे सारखी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. हा चित्रपट येत्या 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही पहा –
Chhaava Movie : महिलांसाठी छावाच्या FREE शोजचे आयोजन, कधी आणि कुठे?