घरमनोरंजनआनंद दिघेंच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रसाद ओकने केली मोठी घोषणा; लेखन क्षेत्रात करतोय...

आनंद दिघेंच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रसाद ओकने केली मोठी घोषणा; लेखन क्षेत्रात करतोय पदार्पण

Subscribe

आज 26 ऑगस्ट म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथी. आजच्या दिवसाचं औचित्य साधून अभिनेता प्रसाद ओक(prasad oak) याने एक विशेष घोषणा सुद्धा केली आहे.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे(dharmaveer  – mukkam post thane) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेने या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची मुख्य भूमिका या चित्रपटात साकारली. प्रसादने साकारलेलया या भूमिकेचं सर्वानीच खूप कौतुक केलं. धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटले तरीही या चित्रपटाची जादू ओसरली नाही. या चित्रपटाचे संवाद सुद्धा प्रेक्षकांमध्ये सुपर हिट ठरले. झी मराठी मराठी वाहिनीवरून धर्मवीर हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आज 26 ऑगस्ट म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथी. आजच्या दिवसाचं औचित्य साधून अभिनेता प्रसाद ओक(prasad oak) याने एक विशेष घोषणा सुद्धा केली आहे.

हे ही वाचा – ‘उलगडणार धर्मवीरची पडद्यामागची कहाणी’

- Advertisement -

आनंद दिघे(anand dighe) यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांच्यासह प्रवीण तरडे(pravin tarade) आणि मंगेश देसाई(mangesh desai) यांनी सुद्धा आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. प्रसाद ओक हा एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्ह्णून सर्वाना परिचित आहेच पण प्रसाद ओक आता लेखकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय आणि दिग्दर्शनासोबत प्रसाद ओक लेखन क्षेत्रात पदार्पण करत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ”माझा आनंद”(majha anand) हे पुस्तक प्रसाद ओकने लिहिलं आहे. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होईल असंही प्रसाद ओक म्हणाला. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रसाद ओकने ही घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @oakprasad

- Advertisement -

हे ही वाचा –  प्रसाद ओकच्या चाहत्याने केलं आख्खं थिएटर बुक, म्हणाला, धर्मवीर मला…

प्रसाद ओक(prasad oak) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. प्रसाद ओकने आज आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त ”माझा आनंद” हे त्याचं नवीन पुस्तक लवकरच प्रकाशित होईल असं इन्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहे. ‘मा. दिघे साहेबांना विनम्र अभिवादन…!!! लवकरच #धर्मवीर च्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटा इतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा..!!’ अशा शब्दांत प्रसाद पोस्ट शेअर करत व्यक्त झाला आहे.

हे ही वाचा – फक्त मराठी सिने सन्मान पुरस्कारात ‘धर्मवीर’ची बाजी; पटकावले ७ पुरस्कार

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -