“आमच्या घरात दोन…”, प्रसाद ओक ‘बायको’बद्दल काय म्हणतोय बघा!

सध्या प्रसाद ओक याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने हा व्हिडीओ खास त्याच्या बायकोची तक्रार करण्यासाठी तयार केला आहे.

Prasad-Oak-Viral-Video

दिग्दर्शित, अभिनेता आणि गायक अशा अनेक भूमिका साकारणारा प्रसिद्ध व्यक्तीमत्व प्रसाद ओक नेहमीच चर्चेच असतो. प्रसाद ओक सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. प्रसाद ओक याच्या काही पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय देखील ठरतात. सध्या प्रसाद ओक याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने हा व्हिडीओ खास त्याच्या बायकोची तक्रार करण्यासाठी तयार केला आहे.

प्रसाद ओक याची बायको मंजिरी ओक ही एक उद्योजिका आहे. सोशल मिडियावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून मंजिरी छोट्या उद्योजकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असते. वेळोवेळी तो आपल्या बायकोबद्दल व्यक्त होताना दिसून आला आहे. यावेळी त्याने चक्क आपल्या बायकोची तक्रार करण्यासाठी हा व्हिडीओ तयार केलाय. या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक म्हणतो की, “आमच्या घरात दोन वाक्य कायम ऐकू येतात… एक.. कपडे ठेवायला जागाच नाहीय यार.. एक नवीन कपाट बनवूया? आणि दुसरं.. बाहेर जायला माझ्याकडे कपडेच नाहीयत यार… आणि ही दोन्ही वाक्यं एकच व्यक्ती बोलते..’ असं म्हणत प्रसादने थेट चाहत्यांपुढे एक कोडं मांडलं. “ओळखा बरं ही व्यक्ती कोण?” असं प्रसाद ओकने चाहत्यांना विचारलं.

प्रसाद ओकचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याची बायको मंजरी ओकही रिअॅक्ट झाली. या व्हिडीओमध्ये प्रसाद ओकचं बोलणं ऐकून मंजिरीने आणखी एका वस्तूची आठवण करून दिली. तिनं कमेंट करत म्हटलं आहे की, मस्कारा पण ना ? तर अमृता खानविलकरनं देखील यावर कमेंट केली आहे. तिनं म्हटलं आहे की, हाहा..हाहा..मला माहितेय?

धर्मवीर सिनेमातून प्रसाद ओकने अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. प्रसादच्या आजवरच्या करियरमध्ये त्याची बायको मंजिरी हिचा फार मोठा वाटा आहे. प्रसाद आणि मंजिरी या दोघांची जोडी मराठी इंडस्ट्रीत कायम चर्चेत असते. या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे प्रत्येक व्हिडीओ, फोटोंमधून तर दिसून येतंच. पण प्रसाद व मंजिरी एकमेकांबाबत भरभरुन बोलतानाही दिसतात.