प्रसाद ओकच्या चाहत्याने केलं आख्खं थिएटर बुक, म्हणाला, धर्मवीर मला…

सध्या सर्वत्र प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे. बऱ्याच ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल पाहायला मिळत आहेत. मात्र आता अशातच अभिनेता प्रसाद ओकने शेअर केलेला एक व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे प्रसाद ओकच्या एका चाहत्याने धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह बुक केलेले आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण चित्रपटगृह रिकामे असून फक्त एक व्यक्ती दिसत आहे.

संपूर्ण चित्रपटगृह बुक करणारा कोण आहे हा चाहता?

या व्हिडिओमध्ये दिसत अललेली व्यक्ती अभिनेता प्रसाद ओकचा मोठा चाहता आहे. धर्मराज गुरूजी असं हा व्यक्तीचे नाव असून या वेळी काहीतरी वेगळं करायचं असे ठरवून ते चित्रपट पाहायला आले आणि त्यांनी आख्खा चित्रपटगृह बुक केला. कारण आपल्याशिवाय त्यांना इतर कोणतीही व्यक्ती आपल्याबरोबर नको होती. या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत की, “माझी इच्छा होती की मनी एकट्याने हा चित्रपट पाहवा. याचं कारण म्हणजे प्रसाद ओक ज्या चित्रपटामध्ये काम करतात तिथे वेगळी ऊर्जा पाहायला मिळते. मागे एकदा माझ्या धर्मराज फाउंडेशनसाठी त्यांनी एक व्हिडिओ दिला होता. त्यामुळे आज तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी हा संपूर्ण शो बुक केला आहे. कारण मला या चित्रपटात फक्त आणि फक्त त्यांनाच पाहायचे होते. त्यामुळे मी हा संपूर्ण चित्रपटगृह बुक केला”.

हा व्हिडिओ प्रसाद ओकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओ वर अनेक प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत.


हेही वाचा :…..मला चुकीचे समजू नका, Sidhu Moosewala ची ती शेवटची पोस्ट चर्चेत, चाहते झाले भावूक