जिलबी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला आणि या ट्रेलर लाँच वेळी प्रसाद ओक स्वप्नीलच तोंड भरून कौतुक तर केलं पण सोबतीला या दोघांनी एकमेकांबद्दल खास गोष्टी देखील सांगितल्या. जिलबीच्या निमित्ताने स्वप्नील आणि प्रसाद पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक स्वप्नील बद्दल बोलताना म्हणाला ” आम्हाला जिलबीच्या निमित्ताने दोघांना स्क्रीन स्पेस शेयर करता आली. आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय आणि जिलबी च्या सोबतीने आमच्या अनेक कामाची एकत्र सुरुवात झाली. जिलबी होत असताना आमचं ठरलं की आपण सुशीला सुजीत करतोय म्हणून आमच्यासाठी जिलबी अगदीच खास आहे. स्वप्नील कमालीचा अभिनेता आहे आणि त्याचा सोबत काम करताना देखील तितकीच मज्जा आली. मी सेटवर स्वप्नीलला कायम निरखून बघायचो त्याची काम करण्याची पद्धत काम करण्याचा उत्साह हा सेटवर एक खेळीमेळीच वातावरण निर्माण करणार असायचं. स्वप्नील एक अभिनेता म्हणून उत्तम आहे पण निर्मिती विश्वात तो काहीतरी वेगळं करू पाहतोय आणि येणाऱ्या काळात देखील स्वप्नील उत्तम प्रोजेक्ट्स करेन अशी मला खात्री आहे”
सहकलाकारा कडून मिळणार कौतुक हे प्रत्येक अभिनेत्यासाठी खास असतं यात शंका नाही. जिलबी मध्ये स्वप्नील एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय पण आता ही जिलबी नक्की गोड की गूढ हे चित्रपट गृहात जाऊन बघावं लागणार आहे.
हेही वाचा : Shalini Passi : बॉलिवूडची ही अभिनेत्री रोज दुधाने आंघोळ करते?
Edited By : Prachi Manjrekar