घरमनोरंजनकौतूकास्पद! पडद्यामागे काम करणाऱ्यांसाठी प्रशांत दामले यांचा माणूसकीचा हात!

कौतूकास्पद! पडद्यामागे काम करणाऱ्यांसाठी प्रशांत दामले यांचा माणूसकीचा हात!

Subscribe

एक सच्चा नाटककार एक चांगला माणूसही असतो याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. अभिनेते, निर्माते प्रशांत दामले हे पुन्हा एकदा नाटकाशी संबंधीत हातावर पोट असणाऱ्यांसाठी माणूसकीचा हात पुढे केला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तींचा रोजच्या जगण्याचा प्रश्न उपस्थित झाला. यासाठी आता निर्माते, अभिनेते प्रशांत दामले धावून आले आहेत.

- Advertisement -

प्रशांत दामले यांनी नाट्यकुटुंबातल्या २३ जणांना प्रत्येकी १०,०००/- रुपये दिले. त्यामुळे तुर्तास का होईना या पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांचा प्रश्न सुटला आहे. सोशल मीडियावरही प्रशांत दामले यांच्या या कार्याचे कौतूक होत आहे. अभिनेता प्रसाद ओक आमि पुष्कर श्रोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रशांत दामले यांचे कौतूक केले आहे.

- Advertisement -

सध्या साखऱ खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट ही प्रशांत दामले यांची नाटकं रंगभूमीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रशांत दामले यांची निर्मीती असलेले तू म्हणशील तसं! हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -