आज जगाच्या कानाकोपऱ्यात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकरी तसेच मराठी कलाकार विशेष पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी या खास दिवसानिमित्त फोटोशूट केलं आहे. तर अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकरने थेट परदेशात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केलाय. क्षितिजाने एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (prathamesh parab celebrated marathi bhasha gaurav din in thailand)
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस. मराठी भाषेला ज्ञानभाषा अशी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन आणि मातृभाषेचा गौरव करण्यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. दरम्यान प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितीजा थायलंडमध्ये आहेत. असे असूनही त्यांनी अगदी मराठमोळा लूक करत परदेशात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला आहे.
View this post on Instagram
याचा व्हिडीओ शेअर करत क्षितिजाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या थायलंडमधून हार्दिक शुभेच्छा…मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि ओळखीचा एक अभिमानास्पद भाग आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरी मराठी माणसाचं हृदय मात्र नेहमीच मायभूमीकडे ओढ घेत असतं. परदेशात गेल्यावर सुरुवातीला सर्व काही नवीन वाटतं. संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती आणि लोकांचे विचार. मात्र, जसे जसे दिवस जातात, तसतसे आपल्या मातृभाषेची ओढ लागते. मराठीची आठवण वेगवेगळ्या गोष्टींमधून सतत येत राहते. परदेशात जर एखादा मराठी माणूस भेटला, तर आनंदाला पारावार उरत नाही. ‘तुम्ही कुठून?’ एवढं विचारलं तरी गप्पांना सुरुवात होते आणि परदेशातही मराठीपण जिवंत वाटू लागते’.
‘परदेशात वेगळी भाषा वापरण्याची गरज असली तरी मनातल्या मनात मराठीचाच विचार सुरू असतो. एखादं इंग्रजी वाक्य बोलताना मध्येच “अहो, काय सांगू!”, “हे लोक काय बोलतात काहीच कळतं नाही!”, “बघूया काय होतं” असं सहज सुटतं आणि आपण आपल्या मातृभाषेशी किती घट्ट जोडलेलो आहोत याची जाणीव होते. परदेशात असलो तरी मराठी भाषेत बोलताना जो आनंद मिळतो, तो कोणत्याही भाषेत मिळू शकत नाही. म्हणूनच आपण कुठेही असलो तरी आपल्या भाषेवर प्रेम करूया, तिचा आदर करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत तिचं वारसा हक्कानं जतन करूया. जय महाराष्ट्र!’ प्रथमेश आणि क्षितीजाचा थायलंडमधला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
हेही पहा –
Parineeti Chopra : परिणीती चोप्राचे थ्रिलर सिरीजमधून OTT वर पदार्पण