घरमनोरंजन'सासरी रमेपर्यंत तुझी आठवण कायम...' प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोची भावूक पोस्ट

‘सासरी रमेपर्यंत तुझी आठवण कायम…’ प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोची भावूक पोस्ट

Subscribe

सिने इंडस्ट्रीत सुद्धा लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकली. “मला वेड लागले प्रेमाचे…” म्हणत घराघरात पोहोचलेला दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब हा क्षितीजा घोसाळकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीचे विधी सुरू झाले असून सध्या याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने लग्नाआधी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

लग्न म्हटलं की प्रत्येक नववधूच्या मनाची द्विधा मनस्थिती झालेली असते. एकीकडे आपल्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीची गोड स्वप्न तर दुसरीकडे जिथे लहानाचा मोठा झालो ते घर सोडण्याची रुख रुख… लगीन घटिका जसजशी समिप येत जाते तस तसे तिच्या काळजाची धडधड वाढू लागते

- Advertisement -

क्षितीजा घोसाळकरची भावूक पोस्ट

क्षितीजा घोसाळकरने घराबाहेरील फोटो शेअर करून लग्नाच्या काही तासांपूर्वी एक पोस्ट लिहिली आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या घराबाहेर बसलेली आणि उभी राहिलेली पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत क्षितीजाने लिहिलं आहे, “Dear Home Sweet Home, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर. आजपर्यंत , तुझी ‘माझं घर’ अशी असलेली ओळख आता ‘माझं माहेर’ अशी होणार..आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार…तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळालाय! बघ ना, काही मनसोक्त हसतायत…काही अलवार रडतायत..काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय…तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल…त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार…”

“सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला…तुही मग तयार राहा, आपलं नेहमीचं हितगुज करायला…सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल,” असं क्षितीजाने लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

- Advertisement -

क्षितीजाच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

क्षितीजाच्या या पोस्टवर प्रथमेशसह इतर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्याने प्रतिक्रियेत लिहिलं, “किती छान…तुला इकडे एवढं प्रेम देऊ की, तुला दोन्ही घर आपली वाटतील….आय लव्ह यू” तसेच इतर नेटकरी म्हणाले, “किती गोड लिहिलं यार”, “किती छान कॅप्शन लिहिलंय सुंदर.”

प्रथमेश आणि क्षितीजाची ऑनलाइन ओळख झालेली. क्षितीजाचे काही फोटो पाहून प्रथमेशने तिला इन्स्टाग्रामवर मेसेज केलेला. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर झाले. प्रथमेश आणि क्षितीजाच्या आयुष्यात १४ फेब्रुवारी या तारखेला फार महत्व आहे. त्यांची भेट त्याच दिवशी झालेली. त्यानंतर दोघांनी याच दिवशी प्रेमाची कबुली दिली. यावर्षी त्यांच्या नात्याला ३ वर्ष पूर्ण झाली आणि त्याच दिवशी त्यांनी साखरपुडाही केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -