बॉलिवूडमध्ये झालं आणखीन एक लग्न!

राज बब्बर आणि स्मिता सांवत यांच्या मुलाच लग्न मराठ-मोळ्या पद्धतीने थाटन्यात आलं. प्रतिक आणि सानिया एकमेकांना गेल्या ८ वर्षांपासून ओळखतात, हे दोघे गेले दोन वर्ष एकमेकांन सोबत रिलेशनशीप मधे आले. मेहंदी आणि हळदीचे फोटो सोशल मिडीयावर सध्या खूप फेमस झाले.

pratik babbar marries long time girls friend sanya
प्रतिक बब्बर आणि सानिया सागर यांचा विवाह

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझनच चालू आहे! २०१८ तर पूर्णत: लग्नामध्येच गेलं. मग ते प्रियांका-निक असो किंवा दीपिका-रणवीर. आणि आता तर २०१९ ची सुरवातच बी-टाउन मध्ये लग्नाने झाली आहे. आम्ही सांगतोय ते प्रतिक बब्बर आणि सानिया सागर यांच्याबद्दल! लखनऊमधे अगदी थाटामाटात जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत नुकतेच ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

कॉन्ट्रोव्हर्सी झाली तरीही…

प्रतिक आणि सानिया एकमेकांना गेल्या ८ वर्षांपासून ओळखतात. हे दोघे गेली दोन वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा काही बी-टाउन मधले सेलिब्रिटी आपली नाती मीडिया पासून लपवताना दिसतात. मात्र, प्रतिक आणि सानियाने कधीच आपले नाते लपवले नाही. दोघांनीही मीडिया, नातेवाईक यांच्यासमोर आपले नाते कबूल केले. दोघेही बरेचदा मूव्ही डेट, कॉफी डेट आणि एअरपोर्ट या सगळ्याच ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहेत. बऱ्याचदा त्या दोघांच्या नात्यावरून अनेक कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या आहेत. पण त्या सगळ्यावर मात करून अखेर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

हळदीचे फोटो झाले व्हायरल

राज बब्बर आणि स्मिता सांवत यांच्या मुलाचं लग्न मराठमोळ्या पद्धतीने झालं. त्यांच्या मेहंदी आणि हळदीचे फोटो देखील सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाले आहेत. त्यात त्या दोघांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.

दोघांचीही पसंत ‘एंटरटेन्मेंट’!

प्रतिकने बॉलिवूडमध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे एंट्री केली. नंतर त्याने ‘धोबी घाट’, ‘आरक्षण’, ‘एक दीवाना था’ आणि ‘बागी २’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. सानियाबद्दल सांगायचं तर तीदेखील मनोरंजन उद्योगाचाच एक भाग आहे. तसेच तिने ‘म्युझिक व्हिडीओ, शॉर्ट फिल्म्स’ यामध्ये देखील काम केलं आहे. तिने एनआयएफटीमध्ये फॅशन कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच तिने लंडन फिल्म्स अकॅडेमीमधून फिल्म मेकिंगचा कोर्स देखील पूर्ण केला आहे.