Bigg Boss 15 घरात Jay Bhanushali आणि Pratik Sehajpal यांच्यात राडा

pratik sehajpal and jay bhanushali clashed with each other at bigg boss 15 home
Bigg Boss 15 घरात प्रवेश करताच सुरू झाला तांडव, Jay Bhanushali आणि Pratik Sehajpal यांच्यात राडा

बिग बॉस सीझन १५ची (Bigg Bosss 15) जबरदस्त सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात पहिले दोन आठवडे सदस्य एकमेकांना जाणून घेण्यामध्येच घालवतात. परंतु यावेळेस सदस्यांना ओळख करून घेण्याची काही गरज वाटतं नाही आहे. ते पूर्णपणे खेळण्यास सज्ज झाले आहेत. बिग बॉस ओटीटी खेळून आलेला सदस्य प्रतिक सेहजपालचा (Pratik Sehajpal) स्वभाव सर्व सदस्यांना आता खटकत आहे. बिग बॉस सीझन १५च्या सुरुवातीलाच प्रतिक सेहजपाल आणि टेलिव्हिजन अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) यांच्यात चांगलाच राडा झाला आहे.

घरातील साफ-सफाईबाबत प्रतिक सेहजपाल आणि जय भानुशालीमध्ये राडा झाला आहे. या भांडणाचा व्हिडिओ कलर्स टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. प्रतिक आणि जयचे जोरात भांडणं लागलं आहे. अनेक टिव्ही शोमध्ये शांत स्वभावच्या भूमिकेत पाहिलेला जय एवढ्या रागात पहिल्यांदाच प्रेक्षक पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस सीझन १५च्या पहिल्याच दिवशी प्रतिक आणि मायशा अय्यरसोबत भांडण झालं होत. जेव्हा मायशा कपडे बदलण्यास जात होती, तेव्हा प्रतिक तिला रोखतो. त्यानंतर ती दुसरीकडे जाऊन कपडे बदलते. तेव्हाही प्रतिक तिथे जातो, त्याला माहित नसते की, मायशा तिथे कपडे बदलत आहे. यानंतर मायशा आणि प्रतिकमध्ये भांडणं सुरू होतात. संपूर्ण घर प्रतिकच्या विरोधात जाते. परंतु यावेळेस बिग बॉस ओटीटीमध्ये प्रतिकसोबत असणारी सदस्य शमिता शेट्टी त्याला सपोर्ट करते. सर्वांना जसे वाटतं आहे, तसा प्रतिकचा उद्देश नव्हता, असं शमिता म्हणते.


हेही वाचा – Ramayana: राम आणि रावणाच्या रुपात दिसणार रणबीर आणि हृतिक!