घरताज्या घडामोडीप्रतीक्षा मुणगेकर दिसणार ‘कोर्टयार्ड ७०४’ मध्ये!

प्रतीक्षा मुणगेकर दिसणार ‘कोर्टयार्ड ७०४’ मध्ये!

Subscribe

‘कोर्टयार्ड ७०४’ ही वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचे लेखन व दिग्दर्शन किरण नारायण कांबळी यांनी केले आहे.  ‘कोर्टयार्ड ७०४’ चे कथानक हे स्त्रीप्रधान असून प्रमुख भूमिकेत प्रतीक्षा मुणगेकर दिसणार आहे. प्रतीक्षा ‘घाडगे अँड सून’ मालिकेत कियाराच्या भूमिकेत दिसली होती. ‘कोर्टयार्ड ७०४’च्या माध्यमातून प्रतीक्षा वेब विश्वात पदार्पण करतेय.

View this post on Instagram

#??

A post shared by Mungekar Pratiksha (@mungekarpratiksha) on

- Advertisement -

या वेब सीरिजची कथा रेवती या पात्राभोवती फिरते. रेवती आपला पती गौतम भागवत सोबत एका सुंदर अपार्टमेंटमध्ये राहावयास येते. परंतु काही दिवसांतच तिला विचित्र आणि अप्रिय गोष्टींचा प्रत्यय येऊ लागतो. शेजारील वृद्ध जोडपे, रमाकांत आणि मिनाक्षी अधिकारी, अचानक विक्षिप्तपणे वागू लागतात. यापुढे काय व कसं घडतं ते ‘कोर्टयार्ड ७०४’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

या आधी प्रतिक्षा ‘तू तिथे मी’, पुढचं पाऊल’, ‘छत्रीवाली’, ‘अग्निहोत्र २’, क्राईम पेट्रोल – दस्तक’ (हिंदी) सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने ‘खैरलांजीच्या माथ्यावर’, ‘बाष्ठ’, ‘विडा, एक संघर्ष’ ‘बाबो’सारख्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.


हे ही वाचा – ‘मी या बाईला अजिबात ओळखत नाही’, अनुरागचा कंगनावर निशाणा!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -