घरताज्या घडामोडीVideo : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – प्रविण तरडे

Video : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – प्रविण तरडे

Subscribe

दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं. मात्र गणपती सजावट करताना त्यांच्या हातून चूक झाली. ही चूक लक्षात येताच त्यांनी ती सुधारली आणि जाहीर माफीही मागितली. पण तरीही त्यांच्या घरावर हल्ला केला जात असल्याच्या काही बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मात्र हे वृत्त खोटं असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Posted by Pravin Vitthal Tarde on Wednesday, August 26, 2020

- Advertisement -

प्रविण तरडे यांनी फेसबुक व्हिडिओद्वारे यावर प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले आहेत,  “माझ्या हातून घडलेल्या चूकीसाठी मी माफी मागितली आहे. लोकांनी मला माफ देखील केलं आहे. परंतु काही मंडळी केवळ दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी माझ्या नावाचा गैरफायदा घेत आहेत. माझ्या नावाने काही खोट्या बातम्या पसरवत आहेत. गेल्या तीन दिवसांत अनेक राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांशी मी फोनवर बोललो. कोणीही मला धमकी वगैरे दिलेली नाही, कोणीही माझ्या घरावर, ऑफिसवर हल्ला केलेला नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर मी लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे.”

- Advertisement -

तरडे यांनी यावर्षी ‘पुस्तक गपणती’ ही संकल्पना ठेवत डेकोरेशन केलं होतं. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही वेळातच त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. प्रवीण तरडे यांनी गणेशमूर्तीच्या ज्या पाटावर ठेवली होती त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते. यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल व्हावे लागले होते. मात्र नंतर त्यांनी ही चूक सुधारत माफी मागितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -