मराठीतला भाई करणार भाईजानबरोबर स्क्रीन शेअर, आता नवीन पॅटर्न ठरणार!

pravin tarde
प्रविण तरडे

आपला पॅटर्नच वेगळा असं म्हणत ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.  या चित्रपटा इतकीच चर्चा झाली ती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची. लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत आणि आपल्या पदार्पणाच्या चित्रपटात ते दबंग खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहेत.  ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात प्रवीण तरडेंनी महत्त्वपूर्ण भूमिकेत ते दिसणार आहेत.

“माझ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे सलमान आणि मी संपर्कात आलो. सलमान या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. हा चित्रपट त्याने अनेकदा पाहिलं आणि त्यातील माझा अभिनय त्याला खूप आवडला. म्हणून ‘राधे’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं. मी लगेचच हो म्हटलं. दहा ते १२ दिवस मी शूटिंगसाठी गेलो होतो. सलमानसोबत स्क्रिन शेअर करायला मिळत असल्याने मी फार खूश आहे. ‘राधे’ या चित्रपटात मी मराठी माणसाचीच भूमिका साकारत आहे.” असे प्रवीण तरडे आपल्या सलमानबरोबर चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले.

मुळशी पॅटर्नचा ‘धाक’

‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘धाक’ असं आहे. यामध्ये सलमानचा मेहुणा आयुष शर्मासुद्धा भूमिका साकारणार आहे. आयुषचा पहिला बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरला. आता धाकमध्ये तरी त्याला प्रेक्षक स्विकारणार का हे येणारा काळच ठरवेल.


हे ही वाचा – तीने गोंडस मुलीला जन्म दिला पण कोरोनाला हे सुख बघवलं नाही!