यंदा मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला प्रविण तरडेंचा पाठिंबा म्हणाले,१०० टक्के नाचायला येणार

मनसेच्या दहीहंडिला प्रविण तरडे यांनी पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Pravin Tarde's support to MNS's world record Dahihandi this year
यंदा मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला प्रविण तरडेंचा पाठिंबा म्हणाले,१०० टक्के नाचायला येणार

गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच रसत्यावर होणारी गर्दी टाळण्याकरीता अनेक रॅली, ऊत्सवांवर देखील निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे गेल्यावर्षी मुंबईत अगदी जल्लोषात साजरा होणारा दहीहंडी उत्सवाला गोंविदाने जाण्याचे टाळले असून त्यांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले. पण यंदा कोरोनाचे सावट कमी होताना दिसत आहे. तसेच लसीकरणाला देखील सुरूवात झाल्याने यामुळे दहिहंडी साजरी होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. आता गोविंदासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे यंदा या वर्षी मनसेनं दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जाहीर करण्यात आलं आहे. यानंतर प्रसिद्ध अभिनेता प्रविण तरडे यांनी या पोस्टवर “१०० टक्के नाचायला येणार” अशी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.

मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहलं आहे की,“विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार”. या पोस्टवरुन अनेक लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अभिनेता प्रविण तरडेने याला पाठिंबा दिल्याने चाहत्यांचा आनंदात आणखी भर पडली आहे. तसेच मनसेच्या दहीहंडिला प्रविण तरडे यांनी पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळला नसून दहीहंडी ,गणेशोत्सव या उत्सवासंबधीत अद्याप संपुर्ण नियमावली राज्य सरकारने  जाहीर केली नाहीये. पण त्यापुर्वीच मनसेनं विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर केल्याने अनेक गोविंदाच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


हे हि वाचा – कॅप्टन दिलीप दोंदे आणि जितेंद्र जोशी झळकणार ‘कोण होणार करोडपती -कर्मवीर विशेष’ भागात