घर ताज्या घडामोडी Bharati Singh : जुळ्या मुलांची आई होणार भारती सिंह? म्हणाली...

Bharati Singh : जुळ्या मुलांची आई होणार भारती सिंह? म्हणाली…

Subscribe

प्रेग्नंट महिला या काळात विश्रांती घेतात परंतु भारती मात्र सतत काम करताना दिसतेय. नुकताच तिचा नवा शो सुद्धा सुरू झालाय ज्यात ती पती हर्ष सोबत निवेदन करत आहे

लाफ्टर क्विन भारती सिंह लवकरच आई होणार आहे. भारती प्रेग्नंट असल्याचे तिने यूटयूबवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं. प्रेग्नंट महिला या काळात विश्रांती घेतात परंतु भारती मात्र सतत काम करताना दिसतेय. नुकताच तिचा नवा शो सुद्धा सुरू झालाय ज्यात ती पती हर्ष सोबत निवेदन करत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारती आणि हर्ष यांच्या आयुष्यात नवा पाहूणा येणार आहे. परंतु त्याआधी भारती जुळ्या मुलांची आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवर भारतीने एका मुलाखतीत खुलासा केला. ती जुळ्या मुलांची आई होणार की याचे तिने फार मजेशीर उत्तर दिले.

भारती जुळ्या मुलांची आई होणार का ? या प्रश्नावर उत्तर देत भारती म्हणाली, “तुम्हाला वाटत का हे जुळ्या मुलांचं पोट आहे. आम्हाला जुळी मुले होणार नाहीत. आम्हाला एकच बाळ होणार आहे. पण आता तो बाबा आहे की बॉबी हे आम्हाला माहिती नाही”.

- Advertisement -

भारती पुढे म्हणाली, “लोक आमच्या बाळासाठी फार उत्सुक आहोत. हर्षला लहान मुले फार आवडतात. पण माझं अजून बाळावर प्रेम का निर्माण झालं नाही हे मला माहिती नाही”, असे म्हणत भारती हर्षला विचारते “कधी होईल मला प्रेम ?” त्यावर सगळे तिला म्हणतात, “बाळ हातात आल्यावर तुला त्याच्यावर जिवापाड प्रेम होईल”.

काही दिवसांआधी भारती एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, “दीड महिन्यानंतर मला कळाले की मी प्रेग्नंट आहे. दीड महिन्यांनी मला थोडा अंदाज आला. मी खात होते शुटींग करत होते. डान्स दिवानेमध्ये डान्स करत होते. तेव्हा एकदा मी सहज म्हटलं चला चेक करुया. चेक केलं आणि मी प्रेग्नंट असल्याचं मला कळालं”.


- Advertisement -

हेही वाचा –  चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमानची एंट्री, पहिल्यांदाच करणार दाक्षिणात्य सिनेमात काम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -