प्रेग्नेंट Sonam Kapoor ने पती आनंदसोबत साजरा केला बेबीमून; शेअर केला नो मेकअप सेल्फी

सोनम कपूर आणि आहुजाचे 8 मे 2018 रोजी लग्न झाले. लग्नानंतर सोनम पती आनंदसोबत लंडनला शिफ्ट झाली आहे. पण ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आणि कामासाठी अनेकदा मुंबईत येते.

pregnant sonam kapoor flaunts baby bump no makeup slfie pool day
प्रेग्नेंट Sonam Kapoor ने पती आनंदसोबत साजरा केला बेबीमून; शेअर केला नो मेकअप सेल्फी

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करतेय, सोनम सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. अशात सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा पूल डे एन्जॉय करताना दिसतेय. यादरम्यान सोनम मस्तीच्या मूडमध्ये दिसतेय. यासोबतच तिने तिचा एक ब्युटी सेल्फीही शेअर केला आहे. (Pregnant Sonam Kapoor)

सोनमने शेअर केला फोटो

सोनम कपूर आणि आनंद आहुजा त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागताची तयारी करत आहेत. दोघांनी काही दिवसांपूर्वीच प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून दोघांच्या या नव्या आनंदाने चाहते खूश आहेत. सोनम कपूर प्रेग्नेंसीच्या काळात स्वत;ची खूप काळजी घेतेय. यासोबतच ती पती आनंद आहुजासोबत खूप वेळ घालवताना दिसतेय. (Sonam Kapoor with Anand Ahuja)

सोनम कपूरने तिचा एक सुंदर नो मेकअप सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ब्लॅक आऊटफिटमध्ये सोनम एका पुलाशेजारी निवांत पडली आहे. तिने गळ्यात गोल्डन चेन परिधान केलेय, या फोटोत तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो स्पष्ट दिसून येतोय. यासोबत तिने स्वत:चा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने ब्लॅक मॅटर्निटी आऊटफिट घातला आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत सोनम सांगतेय की, ती पूलमध्ये वेळ घालवणार आहे. यासोबतच तिने आरशाच्या मागे लपलेल्या पती आनंदची झलकही दाखवली. (Sonam Kapoor baby bump)

 pregnant sonam kapoor flaunts baby bump no makeup slfie pool day
pregnant sonam kapoor flaunts baby bump no makeup slfie pool day

दरम्यान आनंद आहुजा आणि सोनम कपूर सध्या इटलीमध्ये बेबीमून साजरा करत आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या रोमँटिक ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. यात पूल डेच्या आधी सोनम आणि आनंद इटालियन रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले. त्यावेळी या कपलने आईस्क्रीमपासून पास्तापर्यंतचा आनंद लुटला. सोनमने प्रेग्नेंसी क्रेविंग्स पूर्ण करण्यासाठी अनेक पदार्थ खाल्ले होते.

सोनम कपूर आणि आहुजाचे 8 मे 2018 रोजी लग्न झाले. लग्नानंतर सोनम पती आनंदसोबत लंडनला शिफ्ट झाली आहे. पण ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आणि कामासाठी अनेकदा मुंबईत येते. सोनम आणि आनंद त्यांच्या बाळाचे स्वागत करण्यापूर्वी इटलीमध्ये वेळ घालवत आहेत. तिच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, सोनमच्या पुढच्या चित्रपटाचे नाव ब्लाइंड आहे. त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.


अंबानी ते अमिताभ बच्चन पितात या डेअरीचे दूध; एक लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क