घरताज्या घडामोडीPreity Zinta: आई झाल्यावर प्रिती झिंटाने पहिल्यांदा शेअर केला बाळाचा फोटो

Preity Zinta: आई झाल्यावर प्रिती झिंटाने पहिल्यांदा शेअर केला बाळाचा फोटो

Subscribe

प्रितीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी प्रेमाचा वर्षाव करत बाळाला आशिर्वाद दिले

अभिनेत्री प्रिती झिंटा काही दिवसांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलींची आई झाली. प्रितिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आई झाल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. तिने मुलांची नावे देखील सांगितली होती. प्रितीला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. प्रितीच्या मुलाचे नाव जय तर मुलीचे नाव जिया असे आहे. प्रिती आपल्या बाळांची काळजी घेण्यात सध्या व्यस्त होती. मात्र नुकताच प्रितीने तिचा बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात प्रिती बाळाला कुशीत घेऊन उभी असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

- Advertisement -

प्रितीने बाळासोबत शेअर केला फोटो हा सेल्फी आहे. प्रितीच्या कुशीत बाळ छान झोपले आहे तेव्हा प्रितीने हा फोटो क्लिक केलाय. ‘बर्प क्लॉथ्स,डायपर आणि बाळ… हे सगळं मला खूप आवडतय’, असं म्हणत प्रितीने फोटो शेअर केला आहे. प्रितीचे बाळ कसे दिसते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रितीने शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाच पाठमोरे दिसत आहे. प्रितीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी प्रेमाचा वर्षाव करत बाळाला आशिर्वाद दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

- Advertisement -

प्रितीने २०१६मध्ये अमेरिकेचा रहिवाशी असलेल्या जीन गुडइनफ सोबत लग्न. प्रितीने लग्नाची बातमी तब्बल ६ महिन्यांनंतर तिच्या चाहत्यांनी दिली होती. लग्नानंतर प्रिती कायमची लॉस एंजेलिय येथे स्थायिक झाली आहे. प्रिती सतत सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील अनेक घडामोडी शेअर करत असते. प्रितीच्या बाळाचा फोटो पाहून चाहते भलतेच खुश झाले आहे. प्रितीच्या चेहऱ्यावर देखील वेगळाच आनंद दिसत आहे.


हेही वाचा – Top Trends in Search 2021: २०२१मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले बॉलिवूड सेलिब्रेटी कोणते? जाणून घ्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -