Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे प्रीती झिंटा झाली ट्रोल; बॉलिवूड कलाकारांनी केलं समर्थन

‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे प्रीती झिंटा झाली ट्रोल; बॉलिवूड कलाकारांनी केलं समर्थन

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अनेकदा तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रीती झिंटा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान, नुकताच प्रीतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण प्रीतीला ट्रोल देखील करत आहेत. खरं तर, या व्हिडिओमध्ये एक अपंग व्यक्ती प्रिती झिंटाच्या गाडीच्या मागे जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रीतीने स्वतः शेअर केला असून याबाबत तिने स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

हा व्हिडिओ शेअर करत प्रीतीने आपले मत मांडले आहे. यात तिने लिहिलंय की, “ही व्यक्ती मला खूप दिवसांपासून त्रास देत आहे. जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा मी त्याला दिले. मात्र यावेळी माझ्याकडे कॅश नसल्याने मी त्याला पैसे देऊ शकले नाही. यानंतर माझ्यासोबत असलेल्या महिलेने मला पैसे दिले. त्यानंतर मी त्या व्यक्तीला पैसे दिले. पण त्या माणसाने पैसे फेकले आणि तो रागावला. कारण हे पैसे त्याच्यासाठीकमी होते. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. याशिवाय प्रीती झिंटाने बरंच काही लिहिलं आहे.

बॉलिवूड स्टार्सनी पाठिंबा दिला

- Advertisement -

प्रिती झिंटाची ही पोस्ट येताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. प्रीती झिंटाच्या या पोस्टवर अनेक बॉलीवूड कलाकारांनी कमेंट करत तिचे समर्थन केले आहे. मलायका अरोरा, प्रियंका चोप्रा ,ऋतिक रोशनसह अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.


हेही वाचा :

वरुण धवन होणार बाबा? ‘त्या’ व्हिडिओमुळे झाला खुलासा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -