घरमनोरंजन'प्रेमा तुझा रंग कसा'तून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू

‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू

Subscribe

प्रेमातून घडणाऱ्या गुन्हांवर स्टार प्रवाहची 'प्रेमा तुझा रंग कसा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आजवर अनेक कथा-कादबंऱ्यांमधून गुलाबी प्रेम सगळ्यांच्या समोर आले आहे. कायम प्रेमाची एक गोडबाजूच प्रेक्षकांसमोर आली आहे. पण आता प्रेमाची दुसरी काळी बाजू प्रेक्षकांसमोर येत आहे. सत्यघटनांवर आधारीत ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गश्मीर महाजनीची छोट्या पडद्यावर एन्ट्री

‘मला काहीच प्रोब्लेम नाही’, ‘देऊळबंद’, ‘कान्हा’ अशा अनेक चित्रपटातून गश्मीर प्रेक्षकांसमोर आला. अनेक तरूणींचा गश्मीर चॉकलेट बॉय झाला. त्याच्या डान्सवर सगळेच फिदा झाले. हा सगळ्यांचा लाडका गश्मीर ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री घेत आहे. या मालिकेत तो सुत्रसंचालनाच्या भूमिकेत असेल. या विषयी बोताना गश्मिरी म्हणाला की, ‘एक संवेदशनशील व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत आपलं मत मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. बऱ्या-वाईट घटनांबद्दल मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मित्रपरिवाराशी नेहमी संवाद साधतो. प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता प्रेक्षकांशीही मला मनमोकळा संवाद साधायला मिळणार आहे.’

- Advertisement -

सत्यघटनांवर आधारित मालिका

सत्य घटनांपासून प्रेरित अशा प्रेमकथा, त्यातील गुन्हे, त्यांचा तपास या मालिकेतून दाखवले जाणार आहेत. यासाठी जुन्या घडून गेलेल्या घटना या मालिकेत बघायला मिळतील. या मालिकेत गश्मीर वेळोवेळी या घटनांचे विश्लेषण करणार आहे. आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या या घटना प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतील.

प्रेक्षकांच्या नात्याला मान ठेऊन पुढची पायरी – श्रावणी देवधर

या कार्यक्रमाचे प्रमुख श्रावणी देवधर यांनी सांगितले की, ‘लक्ष्य आणि पंचनामा या कार्यक्रमांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्रेक्षकांसोबत स्टार प्रवाहचं एक वेगळं नातं बनलं आहे. या नात्याचा मान ठेऊन पुढची पायरी गाठण्याचा आमचा मानस आहे. प्रेमा तुझा रंग कसा हा कार्यक्रम ही पायरी गाठेल याची आम्हाला खात्री आहे.’

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -