Pushpa 2: ‘पुष्पा २’ची जोरदार तयारी सुरू, बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री दिसणार

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपटाने जोरदार धुमाकूळ घातला. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित झाला आणि हिंदीत १०० कोटींहून अधिक कमाई केली. चित्रपटातील श्रीवल्ली, सामी सामी आणि ऊं अंटावासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं. सध्या आता अल्लू अर्जुनच्या या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुष्पा २’ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटाबाबत बरीच माहिती समोर येत आहे. ज्याप्रमाणे पुष्पा चित्रपटातील ऊं अंटावा या टाईम साँगमधून समांथा रुथ प्रभूने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती, त्याप्रमाणे आता बॉलिवूडची एक अभिनेत्री ‘पुष्पा २’मधून प्रेक्षकांना वेड लावताना दिसणार आहे.

माहितीनुसार, या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव दिशा पटाणी असे आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटात समांथाप्रमाणे एक स्पेशल गाणं दिशा पटाणी करू शकते. ‘पुष्पा २’मधील तीन गाणी तयार झाली असून त्याचे रिकॉर्डिंग झाल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटातील गाण्यांचे संगीतकार देवी श्री प्रसाद आहे. त्यांनी चित्रपटातील तीन गाणी तयार केली आहेत. अशाप्रकारे ‘पुष्पा २’ चित्रपटाची जोरदार तयार सुरू झाली आहे. हा चित्रपट पहिल्या चित्रपटापेक्षा आणखीन जबरदस्त करण्याची तयारी सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @pushpa__song_01

दरम्यान ‘पुष्पा २’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करत आहेत. २०२३मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पुष्पाच्या चाहत्यांमध्ये आता उत्सुकता आणखीनच वाढली आहे.


हेही वाचा – Intermittent Fasting : कॉमेडियन भारती सिंहने वेट लॉससाठी केलेलं इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय ?