घरमनोरंजनभारतात 'पठाण' हाऊसफुल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

भारतात ‘पठाण’ हाऊसफुल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. 15 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक सुपरहिट चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले असून प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संसदेत सर्वांसमोर पठाण चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

शाहरुख खानच्या पठाणची भुरळ फक्त प्रेक्षकांनाच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पडली आहे. त्यांनी बुधवारी संसदेत पठाणचं कौतुक केलं असून सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मोदी म्हणाले की, श्रीनगरमध्ये अनेक दशकांनंतर संपूर्ण चित्रपटगृह हाऊसफुल झाले आहेत. मोदींच्या या वक्तव्यानंतर लोकांना पठाणची आठवण येईल. यूजर्स मोदींच्या वक्तव्याचे कनेक्शन शाहरुखच्या चित्रपटासोबत जोडत आहेत. कारण, ‘पठाण’ चित्रपटामुळे पहिल्यांदा 32 वर्षानंतर चित्रपट हाऊसफुल झाले आहेत.

- Advertisement -

पठाणने कमावले ‘इतके’ कोटी
शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाने आत्तापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 452.90 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरातून या चित्रपटाने 860 कोटींचा टप्पा पार केला आहे.

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल
भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

राखी सावंतचं कपूर हॉस्पिटल होणार मेडिकल चेकअप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -