‘तारक मेहता…’ फेम प्रिया आहुजा लग्नाला १० वर्ष पुर्ण झाल्याने दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात

Priya Ahuja and Malav Rajda of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah renew their wedding vows
'तारक मेहता...' फेम प्रिया आहुजा लग्नाला १० वर्ष पुर्ण झाल्याने दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने गेली १३ वर्ष प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंज केले. या मालिकेप्रमाणे मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे सोशल मीडियावरही मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम मिळत असते. अशातच मालिकेतील एक अभिनेत्री लग्नाला १० वर्षे पुर्ण झाल्याने दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाने दुसऱ्यांदा सप्तपदी घेतली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने पहिला पती दिग्दर्शक मालव राजदासोबतचं पुन्हा लग्नबंधनात अडकली आहे. २० नोव्हेंबरला प्रिया आहुजा आणि मालव राजदा यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. या खास प्रसंगी ते पुन्हा लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईच्या सबर्बन हॉटेलमध्ये प्रिया आणि आहुजाच्या हळदीपासून ते लग्नपर्यंत सर्व कार्यक्रम साजरे झाले. या लग्नानिमित्त तारक मेहता शोमधील कलाकारांसह त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवारातील मोजकी लोकं उपस्थित होते. अनेक कलाकारांकडून आहुजा आणि मालवला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

आहुजा आणि मालवने लग्नावेळी अतिशय सुंदर पेस्टल रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. लाईट पिंक आणि लाईट ग्रीन असं त्यांच्या आऊटफिटचे काँबिनेशन होते. प्रिया आणि मालव यांना एक गोंडस मुलगा आहे. प्रिया आहुजा तिच्या पालकत्वाचा खूप आनंद घेताना दिसली. यात लग्नातही प्रिया आणि मालव सोबत त्यांचा मुलगा हटके पोज देताना दिसला. दरम्यान या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.