‘या’ वेबसिरीजमधून प्रियाची वेबसिरीज जगतात एन्ट्री

प्रिया बापट लवकरच नागेश कुकुनूर दिग्दर्शित 'सिटी ऑफ ड्रीम्स' या हिंदी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.

priya bapat

मराठी ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये एक नाव हमखास घेतलं जातं. ते म्हणजे आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. आजपर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडमारी प्रिया लवकरच वेबसिरीजच्या जगतात प्रवेश करत आहे.प्रिया बापट लवकरच नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या हिंदी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.

हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या आणि प्रियाच्या अवतीभवती फिरणाऱ्या या वेबसिरीज मध्ये तिच्या  व्यक्तिरेखेचे विविध पैलू उलगडणार आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या माध्यमातून प्रिया डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा गाजवणार यात शंका नाही. ॲप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती आणि नागेश कुकुनूर यांचे दिग्दर्शन असणाऱ्या  ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमध्ये प्रिया दिसणार आहे. नागेश यांनी यापूर्वी बॉलिवूडला ‘डोर’, ‘इक्बाल’, ‘धनक’ यांसारख्या उत्तम कलाकृती दिल्या आहेत. लवकरच हॉटस्टारवर ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये आणखी कोण कोण कलाकार आहेत. कोणत्या राजकीय व्यक्तीवर आधारीत आहे. याबद्दल अद्याप उलगडा करण्यात आलेला नाहीये.

प्रियाच्या गाजलेल्या भुमिका

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने ‘चारचाँद’ लावले. ‘काकस्पर्श’, ‘टाईमपास-२’, ‘टाईम प्लीज’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘वजनदार’ या मराठी चित्रपटांबरोबरच ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.