Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रिया बापट झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात

प्रिया बापट झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात

पुढच्या महिन्यात सिंगापूर इथं चित्रीकरण सुरू

Related Story

- Advertisement -

नववर्षात सिनेसृष्टी सज्ज झाली आहे. त्यातच अनेक कलाकार आपल्या नव्या प्रोजेक्ट्सला घेऊन खूप उत्साही आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार नवनव्या चित्रपटांची घोषणा करत आहे. यावर्षात अभिनेत्री प्रिया बापटनेही एक नवे आव्हान स्वीकारले असून ती आंतरराष्ट्रीय सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. प्रियाच्या या कलाकृतीबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचं नाव ‘फादर लाइक’ असं आहे. पुढच्या महिन्यात सिंगापूर इथं याचं चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे.

या प्रोजेक्टविषयी प्रिया सांगते, ‘हा माझा पहिलाच इंग्रजी चित्रपट आहे. परदेशात चित्रित होणाराही हा माझा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी माझ्या कुठल्याही मराठी वा हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण परदेशात झालेलं नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. सध्या व्हिसा आणि इतर गोष्टींची तयारी मी करते. ऑडिशनमध्ये मला आठ शूट द्यावी लागली. त्यामध्ये माझी निवड होण्यापूर्वीच मी कुठे तरी या भूमिकेशी जोडली गेले. आदित्यनं निवड होण्यापूर्वीच कथा सगळ्या कलाकारांच्या हाती दिली. माझी निवड झाली याचा मला आनंद आहे.’ तिच्या या कलाकृतीबद्दल चाहत्यांना उत्सुकता असणार आहे.

- Advertisement -