प्रिया वारियरने ‘या’साठी इन्स्टाग्राम अकाऊंट केले डिअ‍ॅक्टीव्हेट

'विंक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया प्रकाश वारियरने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट केले आहे.

Priya prakash warriar
प्रिया प्रकाश वारियर

आपल्या चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या हावभावांनी अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी ‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेचाविषय बनली आहे. प्रियाने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट केले आहे. त्यामुळे तिने अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट का केले असावे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

…म्हणून इन्स्टाग्राम अकाऊंट केले डिअ‍ॅक्टीव्हेट

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे घरातील सर्वच जण घरात आहे. त्यामुळे कुटुंबाला वेळ देण्याची संधी असल्याचे सांगत प्रियाने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला आहे. याकरता तिने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

प्रियाबाबत थोडक्यात…

प्रिया वारियर हे नाव आता सर्वांच माहिती झाले आहे. मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’ मधील एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीच प्रकाशझोतात आली. त्यानंतर प्रियाने आतापर्यंत तामिळ, तेलुगु, मल्याळम या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा आहे. नजरेने घायाळ करणाऱ्या प्रियाचे सोशल मीडियावर अफाट चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ७ मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. दरम्यान, इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टीव्हेट करण्यापूर्वी तिने मल्याळम भाषेत एक व्हिडीओ देखील शेअर केला होता.


हेही वाचा – अभिनेता सोनू सुदचा गरजुंसाठी मदतीचा हात