Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नव्या गाण्यात हुक्का पिताना दिसली प्रिया वॉरियर, डान्स पाहून चाहते झाले घायाळ

नव्या गाण्यात हुक्का पिताना दिसली प्रिया वॉरियर, डान्स पाहून चाहते झाले घायाळ

Related Story

- Advertisement -

नरजेनं तरुणांना घायाळ करून सोडणारी मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचं तेलुगू चित्रपट ‘चेक’चा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ‘चेक’चा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता चित्रपटातील नवं गाणं ‘निन्नू चुड़ाकुंडा’ प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. एवढंच नाही तर ट्विटवर #PriyaPrakashVarrier हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये आला आहे. अशाप्रकारे पुन्हा एकदा प्रिया वॉरियरनं आपल्या नव्या अंदाजाचे चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या गाण्यांमध्ये ती कधी हुक्का पिताना दिसली तर कधी ग्लॅमरस अंदाजात समुद्र किनारी डान्स करताना दिसली.

प्रिया वॉरियरसोबत या गाण्यामध्ये अभिनेता निथिन आहे. या गाण्याचं म्युझिक कल्याणी मलिकन दिलं आहे, तर श्री मणी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. हे गाणं हरिचरण आणि शक्तिश्री गोपालन यांनी गायलं आहे. ‘चेक’ चित्रपटात प्रिया प्रकाश वॉरियरसोबत मुख्य भूमिकेत सुपरस्टार निथिन देखील आहे. तसंच अभिनेत्री रकुल प्रीत सिंह वकीलाच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisement -

प्रिया प्रकाश वॉरियरचा चित्रपट ‘चेक’ चंद्रशेखर येलेती दिग्दर्शन केलं आहे. २६ फेब्रुवारीला प्रियाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये निथिन कैदीच्या भूमिकेत दिसत आहे, तर रकुल प्रती सिंह क्रिमिनल वकीलाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात Action आणि थ्रिलर पाहता येणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – राखी सावंतला व्हायचंय आई!…पण बाळाचा बाप पाहिजे


 

- Advertisement -