बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड वेब सीरिज आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त प्रियंका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा प्रियंकाचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच, आता प्रियंकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रियंका पती निक जोनसच्या वर्ल्ड टूरवरील कॉन्सर्टमध्ये त्याला चीअर करताना दिसत आहे.
प्रियंका झाली भावूक
📹| Ela toda animadinha dançando 🥹.
Sophie Turner com Olivia DeJonge, Priyanka Chopra e Danielle Jonas durante o show de hoje (12) dos Jonas Brothers, em Nova York. ❤️ pic.twitter.com/U1TU4zKmvu
— Sophie Turner Brasil • Fan Site (@STurnerBrasil) August 13, 2023
प्रियंकाचा पती नीक जोनसचा न्यूयॉर्कच्या यँकी स्टेडियमवर शनिवारी कॉन्सर्ट सुरू होता. यावेळी प्रेक्षकांमध्ये प्रियंका देखील नीकला चीअर करताना दिसली. या लाईव्ह कॉन्सर्टमधील प्रियंकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भावूक होऊन डोळे पुसताना दिसत आहे. प्रियंकाच्या या व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स देखील करताना दिसत आहे.
या चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.