ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी प्रियंका ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राला ग्लोबल स्टार देखील म्हटलं जातं. प्रियंकाचे जगभरात लाखो चाहते आहेत. ती भारततील अशी एकमेव अभिनेत्री आहे जी 40 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. अशातच प्रियंका ब्रिटीश वोग मासिकावर झळकली आहे. या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी प्रियांका एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रियांकाचे काही फोटो शेअर करणयात आले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका हटके लूकमध्ये दिसत आहे. प्रियांकाच्या या लूकने अनेकांचे लक्ष वेधले असून या पेजवर इतर शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियंकाने विविध लूक केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये प्रियंका तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by British Vogue (@britishvogue)

या फोटोशूट सोबतच प्रियंकाने एका खास मुलाखतीमध्ये आई होण्याचा आणि सरोगसी पर्याय निवडण्याबाबत मोकळेपणाने बातचीत केली आहे. मुलीच्या जन्मानंतर तिच्यावर प्रेग्नंन्सीला आउटर्सोर्स करण्याचा आणि सरोगसीद्वारे तयार मुल प्राप्त करण्याचे अनेक आरोप झाले होते. याबाबत प्रियंकाने खुलासा केला आहे.

अमेरिकन गायक निक जोनससोबत झालं लग्न
2015 मध्ये प्रियंका चोपडाला अमेरिकन गायक निक जोनस याने प्रपोज केले होते, ज्यानंतर दोघं तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2018 मध्ये जोधपूर येथे दोघांनी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. 2021 जानेवारीमध्ये प्रियांका आणि निक जोनस एका मुलीचे आई-वडील झाले आहेत. प्रियांकाच्या मुलीचे नाव मालती मेरी असं ठेवण्यात आलं आहे.

या चित्रपटात दिसणार प्रियंका
दरम्यान, प्रियंका चोप्राची नुकतीच ‘द मॅट्रिक्स रिकर्शन’मध्ये दिसली होती. त्यानंतर प्रियांका ‘एंडिंग थिंग्ज टेक्स्ट फोर युन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा :

राखी सावंतची सहा तासांच्या चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून सुटका; नेमकं प्रकरण काय?