घरट्रेंडिंगप्रियांका-निक दीपवीर प्रमाणे करणार दोन पद्धतीने लग्न

प्रियांका-निक दीपवीर प्रमाणे करणार दोन पद्धतीने लग्न

Subscribe

प्रियंका चोप्रा आणि नीक जोनास यांचा विवाह सोहळा जोधपूरमध्ये पार पडणार आहे. २ डिसेंबरला हिंदु पध्दतीने तर ३ डिसेंबरला ख्रिश्चन पध्दतीने लग्न होणार आहे.

प्रियांका चोप्रा आणि नीक जोनास यांचा विवाह सोहळा जोधपूर येथील उमैद भवन पॅलेसमध्ये पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या ‘रोका’ आणि साखरपुड्याच्या फोटोजमधून त्यांच्यातील प्रेम उघडपणे समोर आले आहे. अद्याप त्यांनी कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नसली तरी लग्नाची तयारी मात्र जोरदार सुरू आहे. सुत्रांच्या माहितीनुसार लग्न सोहळ्याला २८ नोव्हेंबर पासून सुरूवात होणार आहे. लग्नाचे सर्व विधी ३ डिसेंबर पर्यंत राजस्थान + मध्ये (मध्ये कधीही एकत्र लिहायचे) सुरू असणार आहेत.

आठवड्याच्या शेवटपर्यंत नीक त्याच्या परिवारासहित भारतात येणार आहे. प्रियंका तिच्या ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमाचे चित्रीकरण २५-२६ नोव्हेंबरला पूर्ण करून ती २८ नोव्हेंबरला जोधपूरमध्ये दाखल होईल. रणवीर आणि दीपिका प्रमानेच आता प्रियांका आणि नीक + सुध्दा दोन वेगवेगळ्या पध्दतीने विवाह करणार आहेत. मिड-डे च्या वृत्तानुसार २ डिसेंबरला हिंदू पध्दतीने विवाह पार पडेल आणि ३ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पध्दतीने लग्न करतील. दोन्ही सोहळे एकाच ठिकाणी संपन्न होणार आहेत.

- Advertisement -

वाचा – या कारणांमुळे प्रियांकाने केलाी नीकची निवड

 

View this post on Instagram

 

Taken.. With all my heart and soul..

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on


बॉलीवूडची सुपरहिट गाणी जसे की गल्लान गुडिया, पिंगा आणि बरीच आंतरराष्ट्रीय गाणी नीक परफॉर्म करणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

वाचा – प्रियांका आणि नीकचे फोटोज १८ कोटींना?

 

View this post on Instagram

 

Bae ❤️@nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on


जोधपूरमधील लग्नाची तयारी स्वतः प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा जवळून पाहत आहे. एका सुत्राकडून अशी माहिती मिळाली की “प्रिन्स हॅरी आणि मेघन जरी लग्नाला येऊ शकले नाहीत तरी हॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी या लग्नाला उपस्थित असणार आहेत अशी अपेक्षा आहे. हॉलीवूड कलाकार पहिल्यांदाच भारतीय विवाहाला उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे प्रियांकाला त्यांना अनुभव एकदम खास बनवू इच्छिते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -