घरमनोरंजनप्रियंका चोप्रा आणि रुही दोसानीने केला 'झूम झूम बाबा' गाण्यावर डान्स; व्हिडीओ...

प्रियंका चोप्रा आणि रुही दोसानीने केला ‘झूम झूम बाबा’ गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा वारंवार विविध कारणांमुळे चर्चेत असते. दरम्यान, प्रियंकाचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंकासोबत सोशल मीडियावरील प्रसिद्ध डान्सर रुही दोसानी देखील दिसत आहे. या दोघी एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. प्रियंका चोप्राच्या व्हिडीओवर बॉलिवूड कलाकारांपासून अनेक चाहते देखील प्रतिक्रिया देत आहेत.

रुही दोसानीने शेअर केला व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruhee Dosani (@ruheedosani)

- Advertisement -

रुही दोसानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये रुही दोसानी आणि प्रियंका चोप्रा एकमेकींशी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर दोघीही मिथुन चक्रवर्तींच्या चित्रपटातील ‘झूम झूम बाबा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण त्यावर कमेंट्स करत आहेत.

दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रियंका तीन वर्षानंतर भारतात आली होती. यावेळी तीने तिच्या हेअरकेअर ब्राँडचं प्रमोशन देखील केलं. सोबतच यूनिसेफशी जोडलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. मात्र, भारतात आल्यानंतर उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये तिला विरोधाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

हॉलिवूडमध्ये देखील अभिनयाची छाप
प्रियंका चोप्राची नुकतीच ‘द मॅट्रिक्स रिकर्शन’मध्ये तिने सतीची भूमिकेत दिसली होती. त्यानंतर प्रियांका ‘एंडिंग थिंग्ज टेक्स्ट फोर युन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा :

महेश बाबू यांचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -