Priyanka Chopra Baby Plans : प्रियांका चोप्रा करतेय बेबी प्लॅनिंग? निकला शेअर केली ‘ही’ मनातील गोष्ट

Priyanka Chopra Baby Plans priyanaka chopra talked about her baby plan with nick jonas says nick and i expecting baby
Priyanka Chopra Baby Plans: प्रियांका चोप्रा करतेय बेबी प्लॅनिंग? निकला सांगितली मनातील गोष्ट

Priyanka Chopra Baby Plans: बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून पती निक जोनससोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. प्रियांकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पती निक जोनसचे (Nick Jonas) आडनाव हटवल्याने या चर्चांना उधाण आले. त्यामुळे प्रियांका-निक अखेर विभक्त झालेत अशा रंगू लागल्यात. या अफवांमध्ये आत्ता प्रियांकाने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्रियांकाने बेबी प्लानिंगबद्दल एक गोष्ट शेअर केली आहे. जोनस फॅमिलीला रोस्ट करत प्रियांका म्हणाली की, निक आपल्या घरी एक गोंडस बाळ घेऊन येण्याचा प्लॅन करतोय. (Priyanka Chopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

बेबीबद्दल प्रियांका- निकचा प्लॅन

अलीकडेच प्रियांका चोप्रा नेटफ्लिक्सवरील ‘द जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ या शोमध्ये बेबी प्लॅनिंगबद्दल बोलताना दिसली. या शोमध्ये प्रियांका पती निक जोनस आणि त्याचा भावाची जबरदस्त फिरकी घेतली. प्रियांका म्हणाली की, आम्ही एकमेव कपल आहोत. ज्यांना अजून मुलं झालेलं नाही. त्यामुळे आज मी सर्वांसमोर असे सांगू इच्छिते की, निक आमच्या बेबीसाठी प्लॅन करतोय. यामुळे आज रात्री आम्ही तुफान दारू पिऊन सकाळपर्यंत झोपून राहू. यावर प्रियांका निकची मस्करी करत म्हणते की, मी बेबी सिटिंग करु इच्छित नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ असा की, तु कोणा दुसऱ्याशी लग्न कर.

सोशल मीडियावर प्रियांकाचा व्हिडिओ व्हायरल

या शोची एक व्हिडिओ क्लिप प्रियांकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. यात ती निक आणि त्याच्या वयाबद्दल बोलताना दिसतेय. यावर प्रियांका सांगतेय की, मला आज खुप आनंद आणि गर्व वाटतोय कारण मी आज पती निक जोनास आणि त्यांचे भाऊ ज्यांनी नाव देखील मला माहित नाहीत, त्यांना रोस्ट करण्यासाठी आलीय. प्रियांका पुढे म्हणतेय की, निक आणि माझ्या वयात १० वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे ९० च्या दशकातील पॉप म्युझिक त्याला समजत नाही, जे मी त्याला समजावते. आम्ही दोघं एकमेकांना शिकवतो, तो मला टिकटॉकबद्दल सांगत असतो आणि मी त्याला एक सक्सेसफुल करियर काय असते? याबद्दल सांगते.

प्रियांकाचा हा व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यावर युजर्सकडून कमेंट्स पाऊस पाडला जातोय. यातच मागील काही दिवसांपासून प्रियांका चोप्राच्या घटस्फोटाच्या चर्चां रंगत होत्या. मात्र प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी या बातम्या खोट्या असून लोकांनी चुकीच्या गोष्टी पसरवू नका असे आवाहन केले आहे.