Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन Happy Birthday Priyanka Chopra's : निक जोनसशी लग्न करण्याआधी 'देसी गर्ल'ने 'या'...

Happy Birthday Priyanka Chopra’s : निक जोनसशी लग्न करण्याआधी ‘देसी गर्ल’ने ‘या’ स्टार्सना केले डेट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्राने उत्कृष्ठ अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये यशाची शिखरे गाठत आता हॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा डंगा वाजवला आहे. या सुपरस्टार अभिनेत्रीचा आज ३९ वा वाढदिवस आहे.

२००० साली मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियंका अभिनयासोबतच आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली. नुकतचं तिने हॉलिवूड सिंगर निक जोनससोबत लग्न गाठ बांधली. परंतु या लग्नाआधी प्रियांकाचे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आले.

मॉडलिंग क्षेत्रात असीम मर्चेंटसोबत जुळले सुत 

- Advertisement -

प्रियंकाने मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करियरची सुरुवात केली. यावेळी प्रियंका असीम मर्चेंटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा चर्चा रंगू लागल्या. परंतु बॉलिवूडमध्ये एंट्री घेतल्यानंतर प्रियकाने ब्रेकअप केले. प्रियंका आणि असीम दोघमध्ये अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान असीमसोबतच्या भांडणामुळे प्रियंकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

खिलाडी कुमारसोबत प्रियंकाचे होते अफेअर 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबतही प्रियंकाचे नाव जोडले गेले. या जोडीने आजवर अनेक हिट चित्रपट दिले. चाहत्यांकडूनही या जोडीला पसंती मिळाली. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय. यानंतर मात्र अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने प्रियंकासोबत काम करण्यास अक्षयला मनाई केली होती.

शाहरुखचा जडला प्रियंकावर जीव 

- Advertisement -

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचेही प्रियकां चोप्रासोबतच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या. शाहरुखचा त्यावेळी प्रियंकावर खूप जीव जडला होता. यामुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. परंतु ही गोष्ट गौरी खानच्या कानापर्यंत पोहचल्याने तिने शाहरुख खानला प्रियंका चोप्रासोबत काम करण्यापासून रोखले.

हॉलिवूड स्टार हिडलेस्टनचे सेल्फी रिलेशन

एमीच्या आफ्टर पार्टीमध्ये हॉलिवूड स्टार हिडलेस्टनलाही प्रियंका फ्लर्ट करत होती. यावेळी दोघे अनेकदा एकमेकांसोबत सेल्फी घेताना दिसून आले. तर अनेकदा एकमेकांचा हात हाता घेऊन फिरताना दिसून आले. यामुळे दोघांमध्ये अफेयर असल्याचे बोलले जात होते.

हरमन बावेजाने प्रियंकासोबत बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल

‘लव स्टोरी 2050’ मध्ये अभिनेता हरमन बावेजाने प्रियंकासोबत बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले. त्याचवेळी या दोघांच्या अफेअरच्याही चर्चा सुरु झाल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही ५ वर्षांपर्यंत एकमेकांना डेट करत होते.

शाहिदने उघडला प्रियंकाच्या घरचा दरवाजा

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरसोबतही प्रियंकाचे बरेच वर्षे अफेयर सुरु असल्याची बोलले जात होते. दरम्यान प्रियंकाच्या घरी आयटी डिपार्टमेंटची टीम दाखल झाली होती. त्यावेळी तिच्या घराचा दरवाजा शाहिद कपूरनं खोलला होता.
यावरून दोघांचे अफेअर सुरु असल्य़ाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु झाल्या. बऱ्याच काळानंतर शाहीदनं प्रियंकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

अखेर २०१८ मध्ये प्रियंकाला आपला हमसफर

अखेर २०१८ मध्ये प्रियंकाला आपला हमसफर भेटला. प्रियंकानं हॉलिवूड स्टार निक जोनससोबत विवाहबंद्ध झाली. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ साली जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला.


 

- Advertisement -