घरमनोरंजनआता 'या' नव्या सिनेमातही झळकणार प्रियांका!

आता ‘या’ नव्या सिनेमातही झळकणार प्रियांका!

Subscribe

प्रियांका चोप्रा लवकरच सलमान खानसोबत 'भारत' सिनेमामध्ये झळकणार अाहे. मात्र, याव्यतिरिक्त देसी गर्लने एक नवा सिनेमासुद्धा साईन केला आहे. प्रियांकाच्या 'या' नवीन सिनेमाची जोरदार चर्चा आहे.

हॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडल्यावर आता ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा, पुन्हा एकदा बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. संजय लीला भन्सालींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात काम केल्यानंतर प्रियांका बॉलीवूडमधून गायबच झाली होती. ‘क्वांटिको-३’ या हॉलीवूड मालिकेच्या शूटिंगसाठी अमेरिकेत गेलेल्या प्रियांकाने बॉलीवूडला जवळजवळ रामराम ठोकला होता. मात्र, आता लवकरच पीसी बॉलीवूडपटात झळकणार आहे. प्रियांका सलमान खानसोबत ‘भारत’ या आगामी सिनेमात काम करणार असल्याचं जवळजवळ नक्की झालं आहे. याशिवाय प्रियांकांने आणखी एक नवीन सिनेमा साईन केल्याचंही समोर आलं आहे. प्रियांकाचा ‘हा’ नवा सिनेमा कोणता आहे आणि त्यामध्ये तिची नेमकी काय भूमिका आहे, याविषयी सिनेसृष्टीत आणि तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘द स्काय इज पिंक’

दिग्दर्शिका सोनाली बोस हिच्यासोबत प्रियांका चोप्रा तिचा नवा सिनेमा करणार आहे. द स्काय इज पिंक असं या सिनेमाचं नाव असून सध्या प्रियांका सिनेमाच्या स्क्रिप्टचं वाचन करत असल्याचं समजतंय. या सिनेमाच्या स्क्रिपटचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्याता आला आहे. या फोटोमधील स्क्रिप्टवर ‘द स्काई इज पिंक- ड्राफ्ट २९’ असं लिहिलेलं दिसतंय. नवा हिंदी सिनेमा सुरु’ अशा अर्थाचं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. सूत्रांनुसार या सिनेमामध्ये प्रियांकासोबत अभिनेता फरहान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी ‘दिल धडकने दो’ या सिनेमांत प्रियांका आणि फरहानची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. याशिवाय मोटीवेशनल स्पीकर आयशा चौधरी हिच्या जीवनावर सिनेमाची कथा आधारित असून अभिनेत्री जायरा वसीम ही भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. सिनेमातील प्रियांकाच्या भूमिकेबद्दल मात्र अद्याप कोणती घोषणा करण्यात आलेली नाहीये. तरी प्रियांकाचे चाहते या बातमीमुळे खूष झाले असणार हे नक्की.

the sky is pink
सौजन्य- सोशल मीडिया
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -