Matrix: घटस्फोटाच्या वादातच प्रियंका चोप्राच्या नव्या सिनेमाचे पोस्टर लाँच, नवा अवतार प्रेक्षकांसमोर

हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

priyanka chopra jonas share new movie matrix resurrections poster during amidst of rumours of divorce
Matrix: घटस्फोटाच्या वादातच प्रियंका चोप्राच्या नव्या सिनेमाचे पोस्टर लाँच, नवा अवतार प्रेक्षकांसमोर

अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या नावापुढून निक जोनसचे आडनाव काढून टाकल्याने प्रियंका सध्या चांगलीच चर्चेत आलीय. निक आणि प्रियंका घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान प्रियंकाने तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केलीय. ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ या सिनेमाचा पहिला लुक प्रियंकाने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. अँड शी इज हिअर असे म्हणत प्रियंकाने सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. HBO च्या बॅनर खाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रियंकाचा नवा अवतार प्रेक्षकांसमोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत इंटरनॅशनल स्टॉर्स कियानु रीव्स त्याचप्रमाणे कैरी ऐनी मॉस, जेडा पिंकेट स्मिथ, याह्रा अब्दुल मतीन आणि जोनाथन ग्रॉफ हे कलाकारही दिसणार आहेत. प्रियंकाच्या या सिनेमासाठी तिचे इंडियन फॅन्सही फार उत्साही आहेत. ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला होता. या सिनेमात दमदार अँक्शन सीन प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

प्रियंकाच्या नव्या सिनेमासाठी तिचे फॅन्स नेहमीप्रमाणे उत्साही आहेत. मात्र यावेळी फॅन्सनी तिला सिनेमाविषयी कमी आणि निक विषयीची जास्त प्रश्न विचारले आहे. प्रियंकाच्या पोस्टच्या कमेंटमध्ये तुम्ही घटस्फोट घेणार का? निक जिजू कुठे आहे? यासारखे प्रश्न तिला विचारण्यात आलेत.

प्रियंका आणि निक जोनसच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना प्रियंकाची आई म्हणजे मधू चोप्रा यांनी पूर्णविराम देत दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा केला आहे. प्रियंका आणि निक घटस्फोटाची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे त्याचप्रमाणे अशी चुकीची माहिती पसरवू नका असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.


हेही वाचा – प्रियंका आणि निक जोनसच्या घटस्फोटाबाबत मधू चोप्रा यांनी केला खुलासा, म्हणाल्या…