Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रियांकाच्या मेट गाला लूकची नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली,सोशल मीडियावर झाली...

प्रियांकाच्या मेट गाला लूकची नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली,सोशल मीडियावर झाली होती ट्रोल

2018 च्या मेट गालामध्ये प्रियांकाच्या लूकची खूप चर्चा झाली.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. प्रियांकाने तिच्या अभिनया कौशल्येच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नाव कमावले आहे. यसोबतच मेट गाला इव्हेंटमध्येही(Met gala) देखील तिने आपली प्रतिमा कायम ठेवली. या वार्षिक वेशभूषा फॅशन शोमध्ये, प्रत्येक सेलिब्रिटी आपली पूर्ण ताकद लावून उत्कृष्ठ आणि सर्वात बेस्ट दिसण्याचा प्रयत्न करतात अगदी प्रियांका सुद्धा आपल्या लूकवर विशेष लक्ष देत काहीतरी हटके स्टाईल करण्यावर भर देते.यामुळेच जगभरातील माध्यमांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. वर्षानुवर्ष प्रियांकाच्या मेट गालावर झळकलेल्या रेड कार्पेट लूकवर एक नजर टाकूया.(priyanka chopra look in met gala events)

2017 मेट गाला-

- Advertisement -

या वर्षी प्रियांकाने सिल्व्हर गाऊन घातला होता जो अतिशय स्टायलिश होता. लाँग कॉलर आणि ऑफ शोल्डर गाऊनमध्ये प्रियांकाने सर्वांना आकर्षित केले. लाँग सिल्क गाऊन आणि हाय हिल्स ब्लॅक बूटमध्ये प्रियांका अत्यंत सुंदर दिसत होती.

2018 मेट गाला –

- Advertisement -

2018 च्या मेट गालामध्ये प्रियांकाच्या लूकची खूप चर्चा झाली. या बरगंडी मखमली गाऊनमध्ये सोन्याच्या मण्यांनी बनवलेले हुड देण्यात आले होते, जे प्रियांकाने डोक्यावर घालून एक अनोखा लूक तयार केला होत्. या वेळच्या मेट गाला विषयानुसार, प्रियांकाने गेटअप केला होता, ज्यामध्ये तिने रेट्रो हेअरस्टाईल केली होती.

2019 मेट गाला-

priyanka chopra met gala
मेट गाला २०१९ मध्ये प्रियांकाने केलेली स्टाईल

हा वर्ष अत्यंत खास होता यंदा प्रियांका पती निक जोनाससोबत 2019 च्या मेट गालामध्ये सहभागी झाली होती. नेहमीप्रमाणे या वेळीही प्रियांकाने काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय माध्यमांना फारसा आवडला नव्हता. प्रियांकाच्या या लूकची अनेकांनी खिल्ली उडवली तर सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल देखील करण्यात आलं होते.


हे हि वाचा – BB OTT: शमिता-राकेशची जोडी सुनंदा शेट्टीला आली पसंत स्पर्धक म्हणाले, सासूबाई तयार आहेत…

- Advertisement -