Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन प्रियांका चोप्राचा ड्रेस पाहून लोकं म्हणाले, चल रे भोपळ्या टूणूक टूणूक

प्रियांका चोप्राचा ड्रेस पाहून लोकं म्हणाले, चल रे भोपळ्या टूणूक टूणूक

दमदार अभिनय आणि तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी प्रेियंका चोप्रा ही तिच्या विचित्र लूकमुळे ट्रोल होत असते. यावेळीही तिच्या युनिक लूकमुळे ती प्रेक्षकांच्या नजरेत आली आहे. तिच्या या लूकवर असंख्य मेम्स वायरल झाले आहेत.

Related Story

- Advertisement -

मिस वल्ड २००३ आणि बॉलिवूड ते हॉलिवूडची सुपरस्टार म्हणून प्रियंका चोप्राने आपली ओळख निर्माण केली आहे. एॅक्टींग आणि फॅशनच्या बाबतीत तर तिला तोडच नाही. प्रियंका सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. पण ही देसी गर्ल अनेकदा तिच्या चित्रविचित्र फॅशन आणि ड्रेसमुळे ट्रोल होते. अलीकडे प्रियंकाने एक वेगळाच ड्रेस घातला होता. त्यातील तिचा विचित्र लूक पाहून सोशल मीडियावर ‘मीम्ससेना’ ही तिच्यावर मिम्स करण्यासाठी तयार झाली आहे. प्रियंकाच्या या ड्रेसवरील लूकवर इतके मीम्स आणि जोक्स बनलेत की ते वाचून स्वत: प्रियंकालाही हसू आवरेनासे झाले.

विशेष म्हणजे प्रियंकाने स्वत: ही काही मजेशीर असे मीम्स सोशल मीडियावर शेअर करुन ‘माझा दिवस बनवण्यासाठी आभार मित्रांनो, असे म्हणून तिने मीम्ससेनेचे आभार मानले आहे. प्रियंकाच्या या लूकवरचे असंख्य मीम्स व्हायरल झालेत. कुणी प्रियंकाच्या ड्रेसला हॉट एअर बलुन, कोणी सुतळी बॉम्ब असे म्हणटले आहे. तर काही जणांनी तिची तुलना लॉलीपॉपसोबत केली तर कुणी पोकेमॉनसोबत.

- Advertisement -

- Advertisement -

 

प्रियंका चोप्राने गेल्या वर्षामध्ये मोनोक्रोमैटिक्स आउटफिट्स, सेक्सी ड्रेसेस, पेन्सिल गाउन्स आणि हाय स्लिट्समधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र बऱ्याचदा स्टायलिश दिसण्याच्या नादात प्रियंकाला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

- Advertisement -