Priyanka Chopra-Nick Jonasच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर लिक? पाहा फोटो

निक जोनसचे न्यू बॉर्न बेबी सोबतचे फोटो त्यांच्या चाहत्यांना फार आवडले. एका फोटोमध्ये निक बाळाला किस करताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत प्रियंकाच्या हातात बाळ असून दोघे त्याचे लाड करत आहेत.

Priyanka Copra-Nick Jonas daughter first photo leaked on social media?
Priyanka Copra-Nick Jonasच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर लिक? पाहा फोटो

देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)  आणि निक जोनस (Nick Jonas)  यांच्या घरी एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. प्रियंका आणि निक सरोगसीच्या माध्यमातून आई वडील झाले. 22 जानेवारीला प्रियंकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर ती आई झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. प्रियंकाच्या गुड न्यूजनंतर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रियंका सध्या तिच्या सर्व वर्कफ्रंट कमिटमेंटपासून मोकळी होऊन आपल्या मुलीची काळजी घेण्यात व्यग्र झाली आहे.

प्रियंकाच्या मुलीची गुड न्यूज ऐकल्यापासून तिच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी तिचे चाहते फार आतूर आहेत. दरम्यान सोशल मीडियावर प्रियंका आणि निक यांचे मुलीसोबतचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. (Priyanka Chopra-Nick Jonas daughter first photo ) निक जोनसचे न्यू बॉर्न बेबी सोबतचे फोटो त्यांच्या चाहत्यांना फार आवडले. एका फोटोमध्ये निक बाळाला किस करताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत प्रियंकाच्या हातात बाळ असून दोघे त्याचे लाड करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by JB LOVER (@camprockfp)

बाळाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी दोघांना आणि बाळाला भरपूर प्रेम दिले. मात्र हे फोटो प्रियंकाच्या मुलीचे नसून निकच्या एका फॅमिली फंक्शनमधील फोटो असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. प्रियंका आणि निकसोबत व्हायरल झालेले फोटो हे प्रियंकाची भाची क्रिष्णा स्कॉय सारकिसन हिचे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रियंकाची चुलत बहिण दिव्या ज्योतीची ती मुलगी आहे.

प्रियंकाने 2018मध्ये अमेरिकेचा प्रसिद्ध पॉप गायक निक जोनससोबत जोधपूर येथे लग्न केले. जवळपास 3 वर्षांनी दोघांनी पालक होण्याचा निर्णय घेतला आणि सरोगसीच्या माध्यमातून दोघेही आई बाबा झाले. 22 नोव्हेंबरला मध्यरात्री प्रियंकाने पोस्ट शेअर ही गुड न्यूज दिली.


हेही वाचा – Priyanka Chopra : Good news! ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सरोगसीद्वारे बनली आई