Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रियंका चोप्राने ऑस्करमध्ये पोहोचलेल्या 'छेल्लो शो' चित्रपटाचं केलं कौतुक

प्रियंका चोप्राने ऑस्करमध्ये पोहोचलेल्या ‘छेल्लो शो’ चित्रपटाचं केलं कौतुक

Subscribe

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. प्रियंका सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. नुकतेच प्रियंकाने काही नवीन फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामुळे प्रियंका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियंकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासोबत गुजराती चित्रपटातील ‘छेल्लो शो’ चे कलाकार दिसत आहेत. शिवाय खाली कॅप्शनमध्ये प्रियंकाने या चित्रपटाबाबत आपलं मत देखील मांडलं आहे.

प्रियंका ‘छेल्लो शो’ चित्रपटाबाबत काय म्हणाली?

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

- Advertisement -

गुजराती भाषेतील ‘छेल्लो शो’ चित्रपटाला भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात आलंय. याच चित्रपटाबाबत प्रियंकाने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने या चित्रपटाबाबत आपलं मत मांडलं आहे. यामध्ये प्रियंकाने हा चित्रपट खूप छान असल्याचं सांगितलं शिवाय या चित्रपटाचा प्रिमीयर लॉस एंजलिसमध्ये ठेवल्याबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांचे तिने आभार मानले आहेत. प्रियंकाने प्रीमीयर दरम्यानचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

हॉलिवूडमध्ये देखील अभिनयाची छाप
प्रियंका चोप्राची नुकतीच ‘द मॅट्रिक्स रिकर्शन’मध्ये दिसली होती. त्यानंतर प्रियांका ‘एंडिंग थिंग्ज टेक्स्ट फोर युन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा :

मिस्ट्री गर्लसोबत अक्षय कुमारच्या मुलाचे फोटो व्हायरल; काय आहे दोघांमध्ये नातं?

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -