Priyanka Chopra : प्रियांका 12 आठवड्याआधीच झाली आई, रुग्णालयात आहे प्री मॅच्युअर बेबी गर्ल

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने यांनी एक खूशखबर दिली आहे. या दोघांनी सेरोगसी द्वारे आई-बाबा झाल्याचे जाहीर केले आहे. या दोघांनीही मनोरंजन विश्वात मोठी खूशखबर दिली आहे. प्रियांकाने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. 'डेली मेल'च्या अहवालानुसार, रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी १२ आठवड्यांपूर्वी सरोगसीद्वारे एका बेबी गर्लला जन्म दिला. प्रियांका चोप्राने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

Priyanka Chopra: Priyanka's mother died 12 weeks ago, pre-mature baby girl is in hospital
Priyanka Chopra : प्रियांका 12 आठवड्याआधीच झाली आहे आई, रुग्णालयात आहे प्री मॅच्युअर बेबी गर्ल

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने यांनी एक खूशखबर दिली आहे. या दोघांनी सेरोगसीद्वारे आई-बाबा झाल्याचे जाहीर केले आहे. या दोघांनीही मनोरंजन विश्वात मोठी खूशखबर दिली आहे. प्रियांकाने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. ‘डेली मेल’च्या अहवालानुसार  प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 12 आठवड्यांपूर्वी सरोगसीद्वारे एका बेबी गर्लला जन्म दिला. प्रियांका चोप्राने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.याशिवाय या अहवालानुसार, या दोघांनी 27 आठवड्यातच एका बेबी गर्लला जन्म दिला आहे. सध्या, नवजात बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियातील रुग्णालयात आहेत. एप्रिलमध्ये बाळाचा जन्म होणार होता मात्र प्री-मॅच्युअर डिलीव्हरीमुळे बाळाला सध्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की प्रियांका आणि निक काही काळ मुलासाठी प्लॅन करत होते परंतु, दोघांच्या व्यस्त शेड्यूलमुळे अडचण येत होती. अशा परिस्थितीत दोघांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला.  प्रियांका आणि निक यांनी सरोगेट आईची खूप काळजी घेतली. सोशल मीडियावर प्रियांकाने ही माहिती देत प्रत्येकाने आपली गोपनीयता राखण्याचे आवाहन केलेय. प्रियांकाने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे.

सोशल मीडियावर माहिती देताना प्रियांका चोप्रा म्हणाली की, ‘आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आम्ही सरोगसीच्या माध्यमातून मुलाचे स्वागत करत आहोत. आम्ही आदरपूर्वक आवहन करतो की, या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगावी. कारण आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. आभार’. ही गूड न्यूज शेअर होताच प्रियांका आणि निकचे सर्वजण अभिनंदन करत आहेत. प्रियांकाच्या या पोस्टवर आता चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटी कमेंट करत शुभेच्छा देत आहेत. तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराकडूनही दोघांचे अभिनंदन केले जातेय.


हे ही वाचा – Faas : शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ‘फास’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस