घरमनोरंजन'मलाही चित्रपटातून बाहेर काढले होते, कारण..'; प्रियांकाने सांगितला अनुभव

‘मलाही चित्रपटातून बाहेर काढले होते, कारण..’; प्रियांकाने सांगितला अनुभव

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावर बॉलीवूडसह सोशल मीडियातूनही विविध प्रतिक्रिया आल्या. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेदेखील आता नेपोटिझमवर भाष्य केले असून स्वतःचा अनुभव सांगितला आहे. प्रियांका चोप्रा हिने मिड डे या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली.

काय म्हणाली प्रियांका चोप्रा

बॉलीवूडमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी होतात. स्टार किड म्हणून जन्म मिळणे काही चुकीचे नाही. अशा कलाकारांनाही विविध अडचणींना सामोर जावे लागते. प्रत्येक कलाकाराचा प्रवास हा वेगळा असतो. माझ्यावेळी देखील मी खुप अडचणी पाहिल्या. बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी संघर्ष केला आहे. एका चित्रपटातून मलाही बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा मीदेखील खुप रडले. निर्मात्यांनी माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लावली होती. पण मी काही काळानंतर त्यातून बाहेर पडले आणि पुढे गेले. त्यांज्यामध्ये मोठे होण्याचे सामर्थ्य असते ते अनेक अडचणींना सामोर जाऊनही मोठे होतातच.

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा समोर आला. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांच्या नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले. कलाकारांच्या मुलांना बॉलीवूडमध्ये प्राधान्य दिले जाते. मात्र नव्या टॅलेंटला इथे वाव मिळत नाही. असे काही अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी मांडले. त्यावर शेखर कपूर, कंगना रनावत, अनुपम खेर, आयुषमान खुराना यांनी प्रतिक्रिया दिल्या. तर मिस वर्ल्ड आणि नंतर यशस्वी अभिनेत्री बनलेल्या प्रियांकानेही आता घराणेशाहीवर भाष्य केले.

हेही वाचा –

तुकाराम मुंढेंच्या कामाविरोधात गडकरींची थेट पीएमोला तक्रार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -